Goa Top News: गडकरींचे भाषण, सनबर्न, पूजा शर्माची अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 12 July 2024 Breaking News: गोव्यातील विविध क्षेत्रातील ताज्या बातम्यांची अपडेट.
गडकरींचे भाषण, सनबर्न, पूजा शर्माची अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या
Assagao House DemolitionDainik Gomantak
Published on
Updated on

पूजा शर्माला दिलासा नाहीच, पुढील सुनावणी सोमवारी

पूजा शर्माला अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

Anjunem Dam: महत्वाची सूचना! अंजुणे धरणातून होणार पाण्याचा विसर्ग

अंजुणे धरणाची पाण्याची पातळी 87 मीटर. जलाशयाची पातळी 90 मिटर झाल्यावर धरणात अतिरिक्त जमा झालेले पाणी सोडण्यात येईल. वाळवंटी नदी किनारी लोकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई स्थित गोव्याचे कवी, साहित्यिक वि ज बोरकर यांचे निधन

मुंबई स्थित गोव्याचे कवी, साहित्यिक वि ज बोरकर आज सकाळी निवर्तले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे सुपुत्र, पत्नी व नातवंडे असा परीवार आहे.

प्रास हा त्यांचा ललीत निबंध संग्रह मौज प्रकाशनाने प्रकाशित केला होता. दर वर्षी मौज, हंस दिवाळी अंकात बोरकर यंदा काय लिहितील यांच्याविषयी वाचकांना कायम उत्कंठा असायची.

अभिनेता गौरव बक्षीला जामीन मंजूर

अभिनेता गौरव बक्षी यांना म्हापसा न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर. संशयित बक्षींनी मंत्री नीळकंठ हळर्णकरांच्या शासकीय वाहनासमोर आपली कार पार्क करुन मंत्र्यांना चुकीच्या पद्धतीने रोखले असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवलेला.

Sunburn 2024: उत्तर नंतर आता दक्षिण गोव्यावर भाजपची वक्रदृष्टी; सनबर्नवरुन आलेमाव आक्रमक

"उत्तर गोव्याचे ड्रग्ज आणि गुन्हेगारी स्थळामध्ये रुपांतर केल्यानंतर, भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आता दक्षिण गोव्यावर आपली वक्रदृष्टी टाकली आहे. दक्षिणेत 2024 च्या सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी देऊन लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्याचा आणखी एक प्रयत्न भाजपने केला आहे", युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

...तर २०२७ मध्ये नक्की भाजप सरकार पुन्हा येईल; गडकरी

मी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांना सल्ला देऊ इच्छितो की एक सर्व्हे करून सरकारबाबत लोकांमध्ये कशाबाबत नाराजी आहे याची माहिती जाणून घ्या. पुढील दोन वर्षांत आवश्यक तिथे चांगले काम करा. २०२७ मध्ये नक्की भाजप सरकार पुन्हा येईल - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

Nitin Gadkari In Goa: फायनान्शियल ऑडीटपेक्षा 'परफोरमन्स ऑडीट' महत्वाचे!

फायनान्शियल ऑडीटपेक्षा राजकारणात परफोरमन्स ऑडीट महत्वाचे. तुम्ही काय करता? कुठे आहात? काय चांगलं केलं काय वाईट केलं याची सगळी माहिती तुमच्या मतदाराला असते‌. प्रत्येक राजकारणाचे परफोरमन्स ऑडीट महत्वाचे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन.

Assagao Demolition Case: अटक टाळण्यासाठी पूजाची धडपड, आता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला असून त्यावरील सुनावणी दुपारी २.३० वा. ठेवण्यात आली आहे. गेल्या बुधवारी (१० जुलै) प्रधान सत्र न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिनासाठीचा फेटाळला होता.

Margoa Fish Market: आमदार विजय सरदेसाईंनी केली घाऊक मासळी मार्केटची पाहणी

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाईंनी मडगावच्या घाऊक मासळी मार्केटची पाहणी केली. कचरा हटवला जात नसल्याबाबतचा ठपका सरदेसाईंनी पालिकेवर ठेवला.

Goa Belagavi Highway:  बेळगाव - गोवा महामार्गावरील अनमोड रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी

बेळगाव - गोवा महामार्गावरील रामनगर-अनमोड रस्त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत सहाचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com