Goa Todays Update News: ‘आमदार अपत्रता याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या, अन्यथा...’ सभापती तवडकरांना अमित पाटकरांचा इशारा

गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर माझ्या दुसऱ्या रिमांडर आणि प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर त्वरीत निर्णय घेतील.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

‘’अपात्रतेच्या याचिकेवर ते त्वरित निर्णय घेतील’’- अमित पाटकर

गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर माझ्या दुसऱ्या रिमांडर आणि प्रलंबित असलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर त्वरीत निर्णय घेतील. लोकशाहीचे संरक्षण करण्यात त्यांच्या अपयशाविरुद्ध न्याय मागण्यासाठी मला न्यायालयात जाण्यास भाग पाडणार नाहीत, असे अमित पाटकर म्हणाले.

Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak

राज्यात 11 जूनपर्यंत ऑरेंज अर्लट जारी; हवामान खात्याची माहिती

राज्यात हवामान खात्याकडून 11 जूनपर्यंत ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Goa Rain Updates
Goa Rain UpdatesDainik Gomantak

दाबोळीत खाजगी वाहनाचा रेंट ए कार म्हणून वापर

राज्यात खाजगी वाहने रेंट ए कार म्हणून पर्यटकांना देण्याचे प्रकार सर्रासपणे चालूच आहे. दाबोळीत असाच प्रकार समोर आला. बुकींगच्यावेळी दुसरेच वाहन दाखवल्याचा पर्यटकाने दावा केला. पोलिस कारवाई करण्यात अपयशी ठरले.

Jeep
JeepDainik Gomantak

‘...2027 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही इंडिया आघाडी म्हणूनच उतरु’- अमित पालेकर

दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष इंडिया आघाडीतून जरी बाहेर पडला तरी गोव्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. इंडिया आघाडीत फूट पडल्याच्या अफवा बिथरलेल्या भाजप पक्षाकडून पसरवल्या जात आहेत. मी परत एकदा सांगतो की, 2027 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही इंडिया आघाडी म्हणूनच उतरु, असे गोवा आपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी स्पष्ट केले.


Amit Palekar
Amit Palekar Dainik Gomantak

गोव्यासह ईशान्य भारतातील जनतेने आम्हाला सेवेची संधी दिलीये- PM मोदी

गोव्यासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आम्ही सत्तेत आहोत. या राज्यातील जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिलीये.

PM Modi
PM ModiDainik Gomantak

धावकोण येथील तरुणावर हल्ला; आरोपींना जिल्हा सत्र कोर्टात हजर करण्यात येणार

धावकोण येथील 30 वर्षीय देवेंद्र गावकर धावकोण यांच्यावर लाकडी दंडुक्याच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी कणकेरी सत्तरी येथील कांता बाबी बेतकेकर (वय वर्ष 41), आणि महादेव बाबुसो गावडे (36, नाणूस - उसगाव) या दोघांना कुळे पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली. आज सायंकाळी सांगे येथील जिल्हा सत्र न्यायलयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.

Court
CourtDainik Gomantak

एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड

दिल्लीत एनडीएची बैठक पार पडत आहे. या बैठकीतच आज एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या बैठकीला हजेरी लावली.

PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

‘’गोव्याच्या दोन्ही जागा जिंकायच्या होत्या, पण...’’; CM दिल्लीत म्हणाले

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दिल्लीत पोहोचले. त्यांनी दिल्लीत एनडीएच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही राज्यातील दोन्ही जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र आम्ही उत्तर गोव्याचीच जागा जिंकलो. दुसरी जागा जिंकू शकलो नाही याचे दुःख आहे."

Chief Minister Dr. Pramod Sawant
Chief Minister Dr. Pramod SawantANI

म्हापसातील दोन तरुणांवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

गणेशपुरी, म्हापसा येथील दोन तरुणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शरणबसू गायकवाड (27), नागराज पुजारी (19) आणि बोरेश पुजारी (38) या तीन फरार आरोपींना म्हापसा पोलिसांकडून अटक करण्यात आली एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

arrested
arrestedDainik Gomantak

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीत; एनडीएच्या बैठकीला उपस्थित

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दिल्लीत पोहोचले. ते एनडीएच्या बैठकीला उपस्थित.

घोडा सुटला अन् शहरात घुसला; मयेत सुटलेल्या घोड्याचा धूमाकूळ

घोडा सुटला अन् शहरात घुसला. मये शहरात सुटलेल्या घोड्याने अर्धा तास धुमाकूळ घातला. दरम्यान, यामुळे वाहतुकीस अडथळाही निर्माण झाला. शहरात एकच गोंधळ उडाला. प्राणीमित्रांनी तात्काळ घोड्याला जेरबंद केले.

कुडचडे-सावर्डे येथील पूलावरुन उडी मारलेल्या प्रकल्पचा मृतदेह आढळला

कुडचडे-सावर्डे येथील पूलावरुन उडी मारलेल्या प्रकल्प प्रशांत गावस देसाई (23, दमणवाडा-शेळपे, केपे ) याचा आज सकाळी मृतदेह आढळला. काल (5 जून) पासून प्रकल्प बेपत्ता होता. मंत्री सुभाष फळदेसाई गुरुवार दुपारपासून कोस्टल गार्ड यांच्याबरोबर शोध मोहिमेत व्यस्त होते. याशिवाय, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कुडचडे, कुडचडे पोलिस आणि तटरक्षक दलही व्यापक शोधमोहिमेत सहभागी होते.

Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com