कमुर्ली प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुजल गावडे आणि कनिष्का गाडेकर या दोन्ही शिक्षिकेंचे निलंबन. शिक्षण खात्याकडून आदेश जारी.
पर्वरी मंत्रालयात मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांना घेराव घालण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारावर अडविले. मुख्य सचिव भेट झालीच नाही. या विषय आम्ही राज्यपालांपर्यंत घेऊन जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर
कुठेही Hill Cutting झाले की त्याचा दोष TCP खात्याला देण्यात येतो ते चुकीचे. फक्त TCP खातेच Hill Cutting मान्यता देत नाही. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि भेटही घेणार आहे. मंत्री विश्वजीत राणेंचे प्रतिपादन.
रेईश मागूश DLF बांधकाम प्रकल्पाची सगळी माहिती मागवली आहे. जर त्याच्याकडे सर्व परवाने असतील तर आम्ही काही करू शकत नाही. मात्र जर काही चुकीचे असेल तर अवश्य कारवाई करण्यात येईल. मंत्री विश्वजीत राणेंची माहिती.
जमीन रुपांतरण प्रकरणी सचिवांना घेराव घालण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेत्यांची गोवा विधानसभेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली.
शेत जमीनी रुपांतरीत करून तीच विकत घेतल्याच्या प्रकरणावरून मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांना संध्याकाळी 4 वाजता काँग्रेसचा घेराव. तर मंत्री विश्वजीत राणेंनी पावणे चार वाजता बोलावली पत्रकार परिषद.
त्या शिक्षकांना कायद्यानुसार योग्य शिक्षा होणार. पोलिस आणि शिक्षण खाते त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षा करणे गैर. अशा शिक्षकांसाठी समुपदेशक नेमण्याबाबत शिक्षण सचिवांना निर्देश दिले आहेत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.
राज्य माहिती आयुक्त (SIC) पदी आत्माराम बर्वेंच्या निवडीचा वाद पोचला राज्यपालांकडे. राज्य सरकारला दिलेली २४ तासांची मुदत संपल्याने कॉंग्रेसकडून आता बर्वेंची निवड रद्द करण्याबाबत राज्यपालांना पत्र.ही राजकीय नेमणूक असल्याचा कॉंग्रेसच्या सुनील कवठणकरांचा आरोप.
शेत जमीनीचे रुपांतरण करून ती आपणच विकत घेतल्याच्या प्रकरणावरून वादग्रस्त ठरलेले राज्याचे मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांना कॉंग्रेस आज संध्याकाळी घालणार घेराव.
काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निरक्षरांचा डेटा गोळा करणे आणि व्यवसायाचे ज्ञान याविषयी केलेल्या विधानावर जोरदार टीका. जनतेने मुख्यमंत्र्यांच्या विधानाला बळी पडू नये म्हणून इशारा देणारे पोस्टर जारी करुन कॉंग्रेसने सावंतांचे व्यवसाय मॉडेल म्हणजे जमीन विक्री, ड्रग ट्रेड आणि गुन्हेगारी माफियांना प्रोत्साहन असा टोला हाणला आहे.
मुलांना पारंपरिक माटोळीचे त्याचबरोबर व्यवहाराचेही ज्ञान मिळावे यासाठी शालेय पातळीवर चतुर्थीचा बाजार महत्त्वाचा - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. साखळी रवींद्र भवनात चतुर्थी बाजाराचे उदघाटन. मुख्यमंत्र्यांनी खरेदी केले चतुर्थीचे सामान.
अस्नोडेच्या बगलमार्गाला अस्नोड्याचे सुपूत्र हुतात्मा स्व. बाळा राया मापारी यांचे नाव देण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा.
अस्नोडेच्या प्रलंबित चौपदरी बगलमार्गाची पायाभरणी. मंत्री निळकंठ हळर्णकर, खासदार सदानंद शेट तानावडे आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिजिटल पद्धतीने केला कामाचा शुभारंभ.
गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत टुगेदर फॉर युनिव्हर्सिटी पॅनल विजयी. सतेज खांडेपारकर अध्यक्षपदी, चेतन नाईक सचिवपदी, वैभव पै क्रीडा प्रतिनिधी, प्रभा नाईक महिला प्रतिनिधी तर आर्य प्रभुदेसाई यांची संशोधन विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती. मंगळवारी पार पडली निवडणूक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.