पेडण्यातील टॅक्सी आंदोलकांच्या सहा पैकी पाच मागण्या गोवा सरकारने मान्य केल्या आहेत. पण, मोपा विमानतळावरील गोवा माईल्सचे काउंटर बंद करण्याची मागणी मान्य करण्यात आलेली नाही. मोपा वरील गोवा माईल्सचे काउंटर बंद करता येणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मान्य केलेल्या मागण्या लेखी स्वरुपात मिळत नाहीत, तोवर माघार नाही, अशी भूमिका टॅक्सी आंदोलकांनी घेतली आहे.
मालवण येथे कोसळलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपच्या विकासाच्या मॉडेलचे सत्य दर्शवते. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचार. महाराष्ट्रातील लोक या भ्रष्टाचाराला विसरणार नाहीत आणि त्यांना राज्यातून कायमचे हद्दपार करतील.
डिचोली रस्त्यावरील कारापूर येथे कार दरीत कोसळून अपघात. चालकासह कारमधील होंडा येथील तिघे युवक सुखरूप. नियंत्रण गेल्याने कार दरीत.
बाणस्तारी अपघात प्रकरणातील संशयित ॲड.अमित पालेकर यांचा जामीन रद्द. पालेकर यांनी जामीन रद्द करण्यासाठीचा अर्ज क्राईम ब्रँचने फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालय फोंडा यांनी त्याचा जामीन रद्द केला. ॲड. पालेकर यांना क्राईम बॅच कडुन केव्हाही अटक होण्याची शक्यता.
फडणवीस गोव्यात पायाभरणीसाठी आले होते की महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेसाठी 'बॅगा' न्हेण्यासाठी? कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा सवाल. लोकशाही लयाला नेण्यास फडणवीसांचा मोठा वाटा. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची टीका.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेत महायुतीचा पराभव निश्चित. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची टीका.
धोकादायक, गुन्हेगार, भ्रष्टाचारी आणि देशविरोधी असणारे विरोधकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते संत होतात का? त्यांचे पाप धुवून टाकले जातात का? केवळ विरोधकांना लक्ष करण्यासाठी वक्तव्य केली जातात का? फक्त मतं मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करणारे खरे देशभक्त आहेत का? असे लोक देश आतून पोखरत आहेत. असे लोक स्वार्थासाठी देश संपवू पाहत आहेत. अशा लोकांना तुरुंगात डांबून त्यांना निवडणूक लढविण्यापासून बंदी घालायला हवी. लोकांना मूर्ख बनवणे थांबवा. भाजपला आरशात पाहण्याची गरज, आमदार कार्लुस फेरेरा.
पेडणे टॅक्सी आंदोलकांचा विषय सोडविण्यासाठी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर समर्थ आहे. माझे घर पेडण्यातच असल्याने पेडणेवासियांशी माझे भावनिक नाते. मंत्रालयात आपण वैयक्तिक कामासाठी आलो होतो. मांद्रेचे आमदार जित आरोलकर यांचे वक्तव्य.
पेडणेतील टॅक्सी आंदोलक आणि आमदार प्रवीण आर्लेकर मंत्रालयात दाखल. आज (२६ ऑगस्ट) मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी आंदोलकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ दिली होती. सरपंच अमित सावंत देखील टॅक्सी आंदोलकांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला.
अष्टमीनिमित्त (gokulashtami) नार्वेच्या पंचगंगा तीर्थस्थळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला अभिषेक. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली सेवा. ( Krishna Janmashtami 2024)
राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार हे कोकणी किंवा मराठीतून आल्यासही सरकार उत्तर देणार. कोकणी मराठीसाठी सरकारचे राज्यभाषा संचालनालय चांगले काम करीत असून लवकरच मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार आहे - मुख्यमंत्री. साखळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा सुरू.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.