कॅश फॉर जॉब प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची गरज नाही. पोलिसांचा तपास व्यवस्थित सुरु असल्याचे गोव्याचे डीजीपी अलोक कुमार यांनी सांगितले.
कॅश फॉर जॉब प्रकरणी योगेश कुंकळ्येकरला फोंडा न्यायालयाने दणका दिला. न्यायालयाने योगेशला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणात नाव समोर आलेल्या GTDC अध्यक्ष गणेश गावकर यांची चौकशी सुरु आहे अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. एका ऑडिओ क्लिपमध्ये गावकर यांचे नाव समोर आले होते.
गोव्यात गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणात राजकीय कनेक्शन आहे का? याबाबत दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सांवत यांनी मोठा खुलासा केला आहे.
दक्षिणेत याप्रकरणी एकूण १२ गुन्हे नोंद झाले असून, २० जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. यातील दोन सरकारी नोकर असल्याची माहिती सावंत यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात अद्याप राजकीय कनेक्शन उघड झालेले नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकरणात फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या दीपाश्री सावंत गावस हिला १४ दिवस न्यायालयीन कोठडी तर श्रुती प्रभूगावकर हिला ६ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश.
कॅश फॉर जॉब प्रकरणात संशयित उमा पाटील विरोधात कोलवाळ पोलिस स्थानकात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. रेवोडा येथील व्यक्तीला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उमा पाटीलने व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दिले होते.
म्हापशातील कल्पना कॅफेला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कॅफेच्या किचनमध्ये अचनाक आग पेटली. या कोणीही जखमी झाले नाही पण, कॅफेचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलीय.
गोवा - बेळगाव महामार्गावर खराब रस्त्यामुळे अवजड वाहन बंद पडले आहे. यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली आहे. अद्याप घटनास्थळी कोणी हजर झाले नसून, परिस्थिती जैसे थे आहे. वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
रुमडामळ दवर्लीत पंच विनायक वळवईकर यांना जमावाकडून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वळवईकर आके पॉवर हाऊस येथून जात असताना अज्ञात टोळक्याने त्यांना मारहाण केली. यात वळवईकर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी दक्षिण जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
कारवारमध्ये मद्य तस्करीचा प्रयत्न अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावला. जप्तीच्या कारवाईत अधिकाऱ्यांनी ९८ लिटर मद्यसाठी जप्त केला आहे. अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी शोधमोहिम राबवली, दोन दुचाकीच्या मदतीने तस्करी होणारे मद्य जप्त करण्यात आले आहे.
पर्वरीत मोठी वाहतूक कोंडी झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने तसेच, येथील उड्डाण पुलाचे काम सुरु झाल्याने वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.