भाजप ही धर्मशाळा नव्हे! All is Not Well म्हणणाऱ्या लोबोंवर प्रदेशाध्य तानावडे कडाडले; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Live Update: गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा, कला - संस्कृती क्षेत्रात दिवसभर घडणाऱ्या ठळक घडामोडी.
Goa Today News Live: भाजप ही धर्मशाळा नव्हे! लोबोंवर तानावडे कडाडले
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

भाजप ही धर्मशाळा नव्हे! लोबोंवर तानावडे कडाडले

मायकल लोबोंच्या भाजपात All is not well वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंकडून समाचार. भाजप ही धर्मशाळा नव्हे, तानावडेंचे लोबोंना खडेबोल.

वाळपईत ताडपत्रीच्या आधारे सरकारी कारभार!

वाळपईतील पोलिस स्थानक आणि सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर पावसाच्या गळतीपासून संरक्षणासाठी अशी प्लास्टिक ताडपत्री घालण्यात आली आहे. वादळी वाऱ्याच्या पावसात ह्या ताडपत्रीतूनही गळती लागत असल्याची कर्मचाऱ्यांची माहिती.

दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची हजेरी

दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी हजेरी लावली. काँग्रेसच्या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती पाटकरांनी दिली.

CRZ चे उल्लंघन करणारे कोलवा येथील घर जमीनदोस्त

CRZ चे उल्लंघन करणारे कोलवा येथील घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. मामलेदारांनी याबाबत माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांकडून सत्तरीतील सोनाळ कडतरी रस्त्याची पहाणी

पावसाळ्यात म्हादईच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाण्याखाली जाणाऱ्या सत्तरीतील वाळपई मतदारसंघातील सोनाळ कडतरी रस्त्याची जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांकडून पहाणी. संरक्षण भिंत उभारावी की रस्त्याची उंची वाढवावी ह्याबाबत होणार अभ्यास. पर्येच्या आमदार डॉ.देविया राणेंनी विधानसभेत मांडली होती समस्या.

CM सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंतांची निवडणूक सहप्रमुखपदी नेमणूक

महिला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून निवडणूक होऊ घातलेल्या राज्यांमध्ये महिला प्रमुख आणि उपप्रमुखांच्या नेमणूक. गोवा महिला मोर्चा राज्यप्रभारी सुलक्षणा प्रमोद सावंतांची महाराष्ट्र महिला सहप्रमुखपदी नेमणूक.

बेतूल प्रतापनगर नंतर धारबांदोड्यात आणखी एक डोंगर कापणी प्रकरण

बेतूल प्रतापनगर धारबांदोड्यातील डोंगर कापणी आणि झाडांची कत्तल प्रकरणानंतर आणखी एक प्रकरण समोर. दुलैय येथे प्लॉट करून जमीन विक्री सुरू. उपजिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची केली पहाणी‌.

धारबांदोड्यात नेमकं चाललंय काय? तालुका प्रशासन संशयाच्या घेऱ्यात

धारबांदोडा तालुक्यात अनेक ठीकाणी हजारो स्क्वेअर मीटर डोंगर कापणी. हजारो झाडांची कत्तल. हे सगळं घडत असताना सरकारी प्रशासन करतं होतं काय? राजकारणी ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीचा संशय वाढला. सर्वांच्या नजरा कारवाईवर.

Goa CM डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील राहत्या घरी फडकवला 'तिरंगा'

Margao: योगेश शेटकर दुसरा दाऊद इब्राहिम? विजय सरदेसाई

पालिकेचा चुना लावून फारार झालेल्या कारकून योगेश शेटकरला पकडण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. योगेश दुसरा दाऊद इब्राहिम झाल्यासारखे वाटते, विजय सरदेसाई यांची टीका.

धारबांदोडा दुलैय डोंगरावर जमीन सपाट करुन अवैध पद्धतीने प्लॉट विक्री

धारबांदोडा दुलैय येथील डोंगरावर अज्ञात व्यक्तीकडून जमीन सपाट करुन प्लॉट विक्री. प्रशासनाकडून दखल. धारबांदोडा उपजिल्हाधिकारी निलेश धायगोंडकर व दक्षिण गोवा भरारी पथक घटनास्थळी.

Burning Car Assagao: आसगाव खुर्सावाडा येथे बोलेरो जीप जळून खाक

आसगाव खुर्सावाडा येथे बोलेरो जीपगाडीला आग. आगीत संम्पूर्ण जीप जळून खाक. पोलिस तपास सुरु.B

Betul: बेतूल धारबांदोडा डोंगर कापणी, सरकारी यंत्रणेला जाग

बेतूल प्रतापनगर धारबांदोड्यातील डोंगर कापणी आणि झाडांच्या कत्तली प्रकरणी सरकारी यंत्रणेला आली जाग. उपजिल्हाधिकारी भरारी पथकासह पहाणी करून देणार अहवाल. उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकरांची माहिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com