Goa News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, कुंक्कळी पोलिसांनी केली एकाला अटक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, कुंक्कळी पोलिसांनी केली एकाला अटक; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव येथे चालणाऱ्या सट्टेबाजीचा हणजूण पोलिसांकडून पर्दाफाश

आसगाव येथे चालणाऱ्या सट्टेबाजीचा हणजूण पोलिसांनी पर्दाफाश केला. यादरम्यान 12 जणांना अटक पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी यावेळी 7 लॅपटॉप आणि 8 मोबाईल जप्त केले.

Rahul Gandhi: राहुल गांधींचा प्रताप; छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली

राहुल गांधींनी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिली श्रद्धांजली. ट्विटर वर पोस्ट करताना केली मोठी चूक. नेटकऱ्यांनी घेतला समाचार.

Goa Crime: वेटरने चोरली रोकड; गुन्हा दाखल

कोलवा येथील एका कॅफेमधील वेटरने कॅफेमधून ३०,०४० चोरले आणि पळून गेला. त्याच्याविरुद्ध कोलवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक प्रथमेश महाले तपास करत आहेत.

Shiv Jayanti: सत्तरीतील युवा चित्रकार संदेश हरवळकर यांनी रेखाटले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र

खडकी सत्तरी येथील युवा कलाकार संदेश हरवळकर यांनी शिवजयंती निमिती छत्रपती महाराजांचे चित्र काढून त्यांना आदरांजली दिली.

CM Sawant: एजंटपासून सावधगिरी बाळगा, परदेशात जाणाऱ्यांना मुख्यमंत्री सावंतांचे आवाहन

परदेशात नोकरीनिमित्त जाणाऱ्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी यापुढे बोगस एजंटाबाबत सावधगिरी बाळगावी. एनआयआर विभाग फसवणूक झालेल्या तरुणांच्या संपर्कात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa News: स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या मिळतील : मुख्यमंत्री

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना 6 महिन्यांत कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळेल. उर्वरित 60-70 स्वातंत्र्य सैनिकच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. स्वातंत्र्यसैनिक योजनेत सुधारणा : प्रमोद सावंत

Goa Cabinet: महाकुंभमेळ्यात 60 वर्षांवरील व्यक्तीचे निधन; आम्ही आधीच भाविकांना सुचित केले होते : मुख्यमंत्री

गोव्यातील भाविकांना पूर्वीच कल्पना दिली होती की ६० वर्षाच्या खालील आणि आरोग्याने सक्षम असलेल्या भाविकांनीच प्रयागराज महाकुंभमेळ्याला उपस्थिती लावावी. ज्या व्यक्तीचे निधन झाले ती व्यक्ती ६० वर्षांवरील होती : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर या नवीन खात्याला कॅबिनेटची मान्यता

डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर या नवीन खात्याला कॅबिनेटची मान्यता. यापुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे नवीन खाते बघणार. ज्या अभियंत्यांना या नवीन खात्यात काम करण्याची इच्छा आहे त्यांना पाहिले प्राधान्य – प्रमोद सावंत

Goa Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कुंक्कळी पोलिसांनी केली एकाला अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुंक्कळी पोलिसांनी सुशन जीवन नाईक (रा. साझोरा, झारखंड) याला अटक केली. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी कुंक्कळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीवर गोवा बाल कायदा आणि पॉस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa Accident: शेल्‍डे येथे भीषण अपघात; सात लोकं प्रवास करत असल्याची शक्यता

शेल्‍डे येथे मंगळवारी (दि. १८ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत सात लोकं प्रवास करत असल्याची शक्यता. अद्याप कोणाला इजा झाल्याची माहिती नाही.

Shivjayatnti Goa: शिवशाहीमुळे धर्मांतरणावर रोख : मुख्यमंत्री

गोमंतकीय खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीत राहून सुरक्षित राहिले आहेत. अन्यथा पूर्ण गोमंतकीयांवर पोर्तुगीजांचे राज्य ४५० वर्ष स्थापित होऊन त्यांनी कधीच धर्मांतरण केले असते. शिवशाहीमुळे धर्मांतरण रोखले गेले : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa Crime: सुर्ल फेरी धक्क्याजवळ आढळला पुरुषाचा मृतदेह

सुर्ल फेरीधक्क्याजवळ उल्हास विनायक नाईक यांचा मृतदेह आढळला. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. पुढील तपास सुरू.

Shiv Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य युवा पिढीला व राज्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. त्यांचे प्रशासन अस्तित्वात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे - मुख्यमंत्री. साखळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीनिमित्त केले महाराजांच्या पुतळ्याचे पूजन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com