

पाटवळ सत्तरी येथे जनावरांचे शिकार तसेच गोळी लागून समद खान (२२) याच्या मृत्यू प्रकरणी बाबु उमर संघार व गाऊस नुर अहमद पटेल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
कळंगुट येथील दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या पर्यटक बोटीला कॅप्टन ऑफ पोर्ट ने काढली नोटीस. क्षमतेपेक्षा जास्ती पर्यटक नेल्याने त्या बोटवर आणली बंदी
नाताळच्या दिवशी गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट समुद्रात बोट उलटल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर ४- ५ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, या बोटमध्ये २४ ते २५ पर्यटक असल्याची माहिती बोटमध्ये यावेळी असलेल्या एका प्रवाशाने सांगितले. दरम्यान, अपघात प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.
कोने - प्रियोळ येथे तीन चारचाकींमध्ये अपघात झाला असून, या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात कसा झाला? तसेच अपघातात कितीजण जखमी झाले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
कळंगुट येथे बोट उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. जलसफारीसाठी गेलेल्या बोटीचा अचानक अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पेडण्याचे आमदार प्रविण आर्लेकरांनी एकाच कारमधून प्रवास केला. यावेळी त्यांना दिल्ली भेटीबाबत विचारण्यात आले पण, दोघांनीही या भेटीबाबत बोलण्यास नकार दिला.
मलपण, सत्तरी येथे बंद असलेल्या खाणीच्या पिठाऱ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला.
नव्याने खुल्या झालेल्या बाणावली बगलमार्गावर पहिला अपघात झाला असून, चारचाकी आणि दुचाकीत झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वीचा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याच्यावर गोमेकॉत उपचार करण्यात आले. सिद्दीकीवर लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आलीय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.