जी-20 परिषदेशी संबंधित कार्यक्रम गोव्यात करण्याचा मोदींचा मानस: मुख्यमंत्री सावंत

उद्योगाला चालना देण्यासाठी केवळ सरकारनेच पावले उचलली पाहिजेत असे नाही. आम्हाला लोकांनी साथ दिली पाहिजे: मुख्यमंत्री सावंत
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गोव्यात जी-20 परिषदेशी संबंधित एक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे, असा खुलासा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी केला. (Goa to host one of the events of G 20 summit says CM Pramod Sawant)

Pramod Sawant
बेरोजगारीत गोवा पाचव्या क्रमांकावर!

गोवा पर्यटन व्यापार कायद्याअंतर्गत www.goaonline.gov.in आणि www.goatourism.gov.in या ऑनलाइन सेवा सुरू केल्यानंतर सचिवालयात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी याबाबत माहिती दिली.

"उद्योगाला चालना देण्यासाठी केवळ सरकारनेच पावले उचलली पाहिजेत असे नाही. आम्हाला लोकांनी साथ दिली पाहिजे.सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलामध्ये पर्यटन संबंधितांनीही सहभाग घेतला पाहिजे," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Pramod Sawant
Goa Sand extraction: पुराव्यांनिशी माहिती देऊनही कारवाई नाही

या क्षेत्रासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून सावंत म्हणाले की, पर्यटकांना (Tourists) पर्यटनाविषयी सर्व माहिती मिळेल. “बेकायदेशीर पर्यटन व्यवसायाला थारा दिला जाणार नाही आणि इतर विभागांच्या समन्वयाने पर्यटन विभागाकडून कसून तपासणी केली जाईल,” असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री रोहन खौंटे, गोवा पर्यटन (Tourism) विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पर्यटन सचिव रवी धवन यांचीही उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पर्यटन मंत्री म्हणाले की, व्यवसाय सुलभ करण्यासाठी सरकारने गांभीर्याने विचार केला असून तो पुढे नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com