Mock Drill Goa: बुधवारी गोव्यात सायरन वाजणार! दक्षिण - उत्तर जिल्ह्यात दोन ठिकाणी होणार मॉक ड्रिल

List of civil defence districts: लोकांना अलर्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. युद्ध होणार नाही पण चुकून झाल्यास लोक अलर्ट असावेत, यासाठी मॉक ड्रिल घेतले जात आहे.
Mock Drill
Mock Drill
Published on
Updated on

पणजी: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. युद्धजन्य परिस्थितीत सामन्य नागरिकांनी याचा समना कसा करावा यासाठी देशातील २४४ जिल्ह्यात बुधवारी (०७ मे) मॉक ड्रिल घेतली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या वतीने याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात बुधवारी मॉक ड्रिल घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज (मंगळवार) गृह सचिव, मुख्य सचिव, महसूल सचिव, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्यात मॉक ड्रिलसाठी दोन ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे सांगितले.

"गोव्यात दक्षिण गोव्यात मुरगाव, वास्को, दाबोळी विमानतळ परिसरात तर उत्तर गोव्यात राजधानी पणजीत मॉक ड्रिल होईल", अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Mock Drill
Deported! गोव्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 49 परदेशी नागरिकांची हकालपट्टी

मॉक ड्रिलसाठी मंगळवारी रात्रीपर्यंत नियोजन केले जाईल, ड्रिल कशापद्धतीने केला जाईल, हे ठरवले जाईल. यापूर्वी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या वेळी अशा पद्धतीची मॉक ड्रिल घेण्यात आली होती. लोकांना अलर्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. युद्ध होणार नाही पण चुकून झाल्यास लोक अलर्ट असावेत, यासाठी मॉक ड्रिल घेतले जात आहे.

मॉक ड्रिलसाठी आवश्यक सर्व तयारी दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करत आहेत. बुधवारी होणारी मॉक ड्रिल यशस्वी होईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. मॉक ड्रिलपूर्वी वाजणार सायरन कसे असेल, याबाबत रात्री होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. याच बैठकीत मॉक ड्रिलची वेळही निश्चित केली जाईल, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com