Deported! गोव्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 49 परदेशी नागरिकांची हकालपट्टी

Goa News: मुदत संपल्यानंतरही देशात राहणाऱ्यांविरोधात अशाच पद्धतीने कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Goa News | 49 Foreign Nationals Deported
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या आत्तापर्यंत ४९ परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाच्या वतीने जानेवारी २०२५ पासून आत्तापर्यंत २४ पुरुष आणि ३५ महिलांना मायदेशी पाठविण्यात आले. या परदेशी नागरिकांची भारतात राहण्याची मुदत समाप्त झाली होती.

परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, १४ पुरुषांमध्ये तीन रशियन, आठ बांगलादेशी एक युगांडा आणि एक नायजेरिया येथील नागरिकांचा समावेश आहे. तर, ३५ महिलांमध्ये १५ युगांडा, १४ बांगलादेशी, चार रशियन तर ब्रिटन आणि युक्रेन येथील प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे.

Goa News | 49 Foreign Nationals Deported
Arshad Warsi Goa Home: रॉयल म्हणजे काय असतं? अर्शदच वारसीचे गोव्यातील 150 वर्षे जुने घर पाहा Watch Video

एप्रिल २०२५ मध्ये १४ परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले. यातील तीन रशियन, दोन बांगलादेशी नागिकांचा समावेश होता. तसेच, दोन युगांडातील महिला, दोन रशिया, बांगलादेश आणि एक युक्रेनची रहिवासी होती. मुदत संपल्यानंतरही देशात राहणाऱ्यांविरोधात अशाच पद्धतीने कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com