Tilari Dam: तिळारी धरणातील पाणी गोव्यात आणण्यासाठी जलसंपदा खात्याच्या गोवा व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना भगीरथ प्रयत्न करावे लागले. अथक प्रयत्नानंतर बुधवारी सकाळी 5.45 वाजता दरवाजा पूर्ण उघडण्यात या अधिकाऱ्यांना यश आले.
या आनंदाच्या बातमी नंतर आज गुरुवारी सडयें पंचायत क्षेत्रातील पिलींबीं परिसरातील ग्रामस्थांना एका संतापजनक घटनेला सामोरे जावे लागले.
तिळारी धरणातून सोडलेले पाणी ओव्हरफ्लो झाल्याने पिलींबीं परिसरातील रस्त्यालगतच्या घरात कचरा आणि गाळयुक्त पाणी गेल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलीय.
कॅनाल मधून आलेला पाण्याचा लोट सडये येथील नागरिकांच्या घरा-दारापर्यंत गेल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले होते. या घटनेमुळे सडयेवासियांना मनस्ताप सहन करावा लागला असून त्यांनी तीव्र शब्दात घटनेचा निषेध केला आहे.
रस्त्यावरून वाहणारे पाणी लगतच्या ओहोळात शिरून नंतर रस्त्यावर येत असल्याने ओहोळातील सांडपाणी, कचरा पाण्यासोबत लगतच्या घरात, शेतात शिरून सर्वत्र चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे.
एकीकडे पाणी येण्याचा आनंद असून सडयेवासियांना मात्र गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे मनस्ताप सहन करावा लागला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.