Goa: 'ज्यांनी कोणी पक्षाशी गद्दारी केली ते स्वत:च संपले'- गिरीश चोडणकर

प्रतिपादन गोवा कॉगेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी कळंगुटात (Calanguta) केले.
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली : राष्ट्रीय क्रॉगेस पक्ष (National Congress Party) ऐतिहासिक पाश्वभूमी असलेला तसेच त्यागी आणी विद्वान लोकांच्या मार्गदर्नानुसार वाटचाल करीत पुढे आलेला पक्ष आहे , ज्यांनी कुणी पक्षाशी गद्दारी  पाठ केली आहे ते स्वताच संपलेले आहेत मात्र पक्ष आणी पक्ष संघटणा आजही शाबूत असल्याचे  प्रतिपादन गोवा कॉगेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी कळंगुटात (Calanguta) केले. 

येत्या विधानसभा निवडणुकीत कॉगेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांनाच जनतेचा पाठींबा लाभणार असून पक्ष संघटणा आणी कार्यकर्ते पुर्ण ताकदीनीशी पुन्हां एकदां लोकांसमोर जाण्यास सज्ज असल्याचे चोडणकर यांनी पुढे सांगितले.  कळंगुट कॉगेस गट समितीच्या वतीने आयोजित स्थानिक  पक्ष कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीत कॉग्रेस पक्षाध्यक्ष गिरीश चोडणकर बोलत होते. पक्षाची खरी ताकद  युवा आघाडी तसेच महिला आघाडीच्या खांद्यावर असल्याचे सांगितले. 

Girish Chodankar
Goa: काँग्रेस आणि भाजपमधून आपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

यावेळी त्यांच्यासमवेत कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नाडीस, कॉग्रेस नेते तथा कळंगुटचे माजी सरपंच जोजफ सिक्वेरा , उत्तर गोवा कॉगेसचे अध्यक्ष विजय भिके , गटाध्यक्ष राजेंद्र कोरगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. कळंगुटचे माजी आमदार तथा पक्षाचे वरिष्ठ नेते आग्नेलो फर्नाडीस यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत कळंगुटातून  कॉग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यापैकी आपण सुद्धा एक असल्याचे सांगितले मात्र, पक्षाकडून कळंगुटसाठी  जो कुणी  उमेदवार निवडला जाईल त्याच्यासाठी निस्वार्थीपणे काम करणार असल्याची बैठकीत ग्वाही दिली.

Girish Chodankar
Goa: येत्या आठवड्यात मी काँग्रेसमध्ये जाणार

कळंगुटचे  माजी सरपंच जोजफ सिक्वेरा (joseph sequera) यांनी प्रस्थापितांची दादागिरी आणी हुकुमशाही मोडून काढण्यासाठी एकजुटीने कॉग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी झटण्याचे उपस्थितांना आवाहन केले. उत्तर गोवा कॉगेसचे अध्यक्ष विजय भिके (Vijay Bheke) यांनी गोव्याचा सुवर्ण काळ पुन्हा एकदां  खेचून आणण्यासाठी तळागाळातील कार्यकरत्यांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी  आपापसातील मतभेदांना मुठमाती देत  विजयाचे इप्सित डोळ्या समोर ठेवून पुर्ण  ताकदीनीशी राजकीय रणांगणात उतरण्याचे आवाहन केले.

Girish Chodankar
Goa: इंधन दरवाढी विरोधात कॉग्रेसची मडगावात सायकल रॅली

सुरुवातीला गटाध्यक्ष राजेंद्र कोरगांवकर (Rajendra Korgaonkar) यांनी सर्वाचे स्वागत तथा प्रास्ताविक भाषण केले , बैठकीत स्थानिक पक्ष कार्यकर्ते सचीन वेगुर्लेकर, स्वप्नेश वायंगणकर, लॉरेन्स सिल्वेरा, केवीन डिसौझा आदींनी आपापल्या समस्या तसेच सुचना पक्षाध्यक्षांसमोर मांडल्या. युथ कॉगेसचे विवेक सिल्वेरा यांनी शेवटी आभार मानले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com