World Peace University Thivim: वर्ल्ड पिस युनिव्‍हर्सिटीला थिवीवासीयांचा विरोध; 'महामोर्चा' काढण्याचा कांदोळकरांचा इशारा

Former Kiran Kandolkar: गोव्याबाहेरील बिल्डरांच्या घशात ही जागा जाण्यापूर्वी तिचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी प्राणपणाने लढा देऊन तिचे जतन करावे, असे त्‍यांनी आवाहन केले.
World Peace University Thivim: वर्ल्ड पिस युनिव्‍हर्सिटीला थिवीवासीयांचा विरोध; 'महामोर्चा' काढण्याचा कांदोळकरांचा इशारा
Former Kiran KandolkarDainik Gomantak
Published on
Updated on

थिवी: थिवी पठारावरील दोन लाख चौरस मीटर कोमुनिदादच्‍या जागेत होऊ घातलेल्या वर्ल्ड पिस युनिव्‍हर्सिटीला विरोध करण्यासाठी रविवारी (1 December) पुन्हा एकदा थिवी ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी तसेच सामाजिक संघटना एकत्र आल्या. कोणत्‍याही परिस्‍थिती प्रकल्‍प मार्गी लावू देणार नाही; प्रसंगी महामोर्चा काढू, असा इशारा देण्‍यात आला.

स्थानिकांनी भूमिका स्पष्ट केली

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी उपस्‍थितांना संबंधित केले व स्‍थानिकांची भूमिका त्‍यांनी विषद केली. दोन लाख चौरस मीटर जागेबरोबरच सहा लाख 33 हजार चौरस मीटर जागा ही आपल्या पुढील पिढीला दिसणारही नाही, गोव्याबाहेरील (Goa) बिल्डरांच्या घशात ही जागा जाण्यापूर्वी तिचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी प्राणपणाने लढा देऊन तिचे जतन करावे, असे त्‍यांनी आवाहन केले.

World Peace University Thivim: वर्ल्ड पिस युनिव्‍हर्सिटीला थिवीवासीयांचा विरोध; 'महामोर्चा' काढण्याचा कांदोळकरांचा इशारा
World Peace University Thivim: खासगी विद्यापीठाविरोधात थिवीवासीयांनी ठोकला ‘शड्डू’! ग्रामसभेला शेकडोंची उपस्‍थिती

मंत्री हळर्णकर पुढे का येत नाहीत?

आमचा विरोध शैक्षणिक संस्थांना नसून तिथे चाललेल्या बेकायदेशीर जमीन विक्रीला आहे. जी जागा या विद्यापीठासाठी लीजवर दिलेली आहे ती एक उंच टेकडी आहे. शेकडो वर्षांपासून ही जागा गुरांना चरण्यासाठी आरक्षित केलेली असताना थिवी मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर ही जागा वाचवण्यासाठी पुढे का येत नाहीत, असा प्रश्‍‍न कांदोळकर यांनी उपस्‍थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com