'I Love You', गोव्यात चोरीसाठी चोरांनी लढवली शक्कल

दक्षिण गोव्यातील मडगाव (Margao) शहरात चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे.
Margao
MargaoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. काही संशयितांनी बंगल्यात घुसून 20 लाखांहून अधिक किमतीच्या मौल्यवान वस्तू घेऊन 'आय लव्ह यू' असा संदेश पाठवला.

मडगाव (Margao) पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घरमालक असीब दोन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी घरी परतले. तेव्हा त्यांना आपला बंगला लुटल्याचे आढळून आले. 20 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि दीड लाखांची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केल्याचे त्यांनी सांगितले.

Margao
Goa: खाणपट्ट्यांतील गावांना पुराचा धोका!

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, चोरांनी टेलिव्हिजन स्क्रीनवर मार्करच्या साहय्याने I LVU लिहिल्याचे मालकाला दिसून आले. निरीक्षक सचिन नार्वेकर (Sachin Narvekar) यांनी सांगितले की, मंगळवारी मडगाव पोलिस (Police) ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध घराची तोडफोड आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Luthra Brothers Bail Hearing
Goa Football Association Awards
Murgaon Raja Shed Demolition
Madgaon Hospital Staff Shortage
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com