Goa Theft Case: दाबोळी येथे दिवसाढवळ्या चोरी; 4 मोबाईल, DSRL कॅमेऱ्यासह लाखोंचा ऐवज लंपास

Goa Theft Case: दक्षिण गोव्यात चोऱ्यांचे वाढते सत्र; देवस्थानांसह शाळा आणि घरांची सुरक्षा धोक्यात
Goa Theft Case
Goa Theft CaseDainik Gomantak

Goa Theft Case: राज्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून दक्षिण गोव्यात दिवसेंदिवस चोऱ्या होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे शनिवारी दाबोळी येथे दिवसाढवळ्या एका घरात चोरी झाल्याचा प्रकार उघड झालाय.

एका घरातून 4 मोबाईल आणि 1 DSRL कॅमेरा असा एकूण लाखभराचा ऐवज चोरांनी लुटल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिणेत चोऱ्यांचे प्रकार अवधित असून या महिनाभरात तब्बल 6-7 प्रकार उघडकीला आले आहेत. आगोंद, येथील श्री आगोंदेश्वर देवस्थानात सकाळी 6.45 वाजता चोरीची घटना घडली.

चोरांनी फंडपेटीतील सुमारे 80 हजारांच्या रकमेसह दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आलीय. अभिषेकासाठी वापरले जाणारे तांब्याचे पात्र, समया तसेच फंड पेटीतील रक्कम मिळून 80 हजारांचा ऐवज लंपास केलाय.

Goa Theft Case
Goa Loksabha Election 2024 Schedule: गोव्यात कधी होणार लोकसभेसाठी मतदान? जाणून घ्या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक

तर मागील आठवड्यात मुरगाव तालुक्यातील काही शाळांना चोरट्यांनी लक्ष करत काही दिवसांच्या फरकाने 3 ते 4 शाळा फ़ोडतर हजारोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान तपास करत असताना पोलिसांना CCTV फुटेजमध्ये तोंडाला मास्क बांधलेली 2 माणसे शाळा परिसरात वावरत असलेली दिसून आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिकांसह पोलीस यंत्रणाही जेरीला आली असून वाढत्या चोऱ्या रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com