Goa Water Crisis: राज्यातील धरणांमधील पाणी पातळी घटली; जूनअखेरपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा

Goa Water Crisis: आठ दिवसांपूर्वी राज्यातील सर्व धरणांमधील जलसाठ्याची पाण्याची पातळी दीड मीटरने कमी झाली होती व आता पुन्हा ती सरासरी दीड मीटरने घसरली आहे.
Goa The water level in the dams has decreased and only enough water is left till the end of June
Goa The water level in the dams has decreased and only enough water is left till the end of JuneGomantak Digital Team
Published on
Updated on

Goa Water Crisis: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यातील सर्व धरणांमधील जलसाठ्याची पाण्याची पातळी दीड मीटरने कमी झाली होती व आता पुन्हा ती सरासरी दीड मीटरने घसरली आहे.

अवकाळी पावसाचा या जलसाठ्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही. या धरणांमध्ये असलेले पाणी जूनअखेरपर्यंत पुरेसे आहे. या धरणांमधील जलसाठा कमी झाला असला तरी मे महिन्यांपर्यंत पुरेल एवढा पुरेसे पाणी त्‍यात आहे असा दावा जलस्रोत खात्याने केला आहे. धरणांमध्ये पाणी आहे, मात्र जुन्या झालेल्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने पाणी वाया जाते. त्यामुळे जुन्या मोठ्या वाहिन्या बदलण्याची गरज आहे. पाणीपुरवठा करणे हे सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे काम असून त्याच्याशी जलस्रोत खात्याचा संबंध नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तुरळक पावसाची शक्यता

राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मात्र गोवा वेधशाळेने पुढील पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. मागील २४ तासांत वाळपई तसेच सत्तरी तालुक्यातील काही भागात तुरळक पाऊस पडला, परंतु इतरत्र कोठे पाऊस पडल्याची नोंद नाही. आज राज्यात कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तर किमान २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com