Goa: बागातील दुर्घटनेनंतर न्हावेलीतील घटनेला उजाळा

न्हावेलीतील 'पावलार' येथील पुलाजवळील वळण तर वाहतुकीस अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित बनले आहे.
न्हावेलीतील 'पावलार' येथील पुल
न्हावेलीतील 'पावलार' येथील पुलDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: बागा-कळंगुट येथील खाडीत मोटारगाडी कोसळून पुणे येथील युगुलाचा दुर्दैवीरित्या अंत होण्याच्या घटनेनंतर आता डिचोली तालुक्यातील न्हावेली-साखळी (Navelim- Sankhalim) येथील घटनेच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी न्हावेलीतील 'पावलार' येथे नदीच्या (Pawlar River) फाट्यात मोटारगाडी कोसळून एका युवकाला जलसमाधी मिळाली होती. या घटनेनंतर या त्याठिकाणी एखादी भीषण अपघाताची घटना घडली नसली, तरी पावलार पुलाजवळील वळण वाहतुकीस आजही धोकादायक वाटत आहे. डिचोली तालुक्यातील विविध भागातील काही रस्ते वाहतुकीस असुरक्षित असून, ठराविक रस्ते तर अपघात प्रवण क्षेत्र बनले आहेत. न्हावेलीतील 'पावलार' येथील पुलाजवळील (Pawlar Bridge) वळण तर वाहतुकीस अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित बनले आहे. जुन्या आणि नवीन पुलाच्या मधोमध असलेला फाट्याचा उघडा भाग असुरक्षित आहे.

न्हावेलीतील 'पावलार' येथील पुल
Goa: पं. दीनदयाळ उपाध्याय यांना डिचोलीत भाजपकडून आदरांजली

पावलार येथे नवीन पूल

'पावलार' येथील जुना पूल एकदम खाली होता. जोरदार पावसावेळी तर हा पूल पाण्याखाली येत होता. या पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठड्याचीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात बऱ्याचदा त्याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत असे. लहान-सहान अपघातही घडत होते. ही समस्या लक्षात घेवून आठ वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणांतर्गत पावलार येथे नवीन पूल बांधण्यात आला आहे. नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

संरक्षक कठडा, पण...

'पावलार' येथील नवीन पूल हा जुन्या पुलाच्या तुलनेत उंचवट्यावर आहे. त्यातच या पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडेही बांधण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन पूल वाहतुकीस सुरक्षित आहे. मात्र पुलाजवळील न्हावेलीच्या बाजूने असलेल्या उतरणीवरील वळणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे वळण वाहतुकीस धोकादायक बनत आहे. दोन वर्षांपूर्वी एका कंपनीच्या कामगारांची ने-आण करणाऱ्या मोटारीचा उतरणीवरील वळणावर तोल गेल्याने मोटार सरळ दोन्ही पुलामधील पाण्यात कोसळली. या घटनेत खरपाल भागातील गावस नामक एका युवकाला जलसमाधी मिळाली होती.

प्रतिबंधात्मक उपाययोजना हव्यात

'पावलार' येथे सुरक्षित वाहतुकीसाठी उतरणीवरील वळण ठिकाणी सुचना फलक वा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अशी वाहनचालकांची मागणी आहे. केवळ पावलार परिसरच नव्हे, तर परिसरच नव्हे. तर न्हावेलीत अन्य काही रस्ते वाहतुकीस सुरक्षित नाहीत. त्याठिकाणीही उपाययोजना कराव्यात. अशी मागणी स्थानिक रहिवासी तथा शिवसेनेचे गोवा विभागाचे सरचिटणीस मिलिंद गावस यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com