Goa: घोटेलीत बेवारस जखमी वासराला पोचवले गोशाळेत

लीना गावस ( Leena Gawas) यांच्या कुटुंबाने त्या वासराला दोन दिवस आसरा दिला व चाराही घातला.
घोटेली 1 , केरी येथे वासराला गाडीत भरते वेळी लीना गावस, गणेश विठ्ठल गावस, सरपंच दाऊद सय्यद, ज्ञानेश्वर मोरजकर
घोटेली 1 , केरी येथे वासराला गाडीत भरते वेळी लीना गावस, गणेश विठ्ठल गावस, सरपंच दाऊद सय्यद, ज्ञानेश्वर मोरजकरDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये : घोटेली 1 केरी सत्तरी (Ghoteli no. 1, keri sattari) येथे जखमी (Injured) अवस्थेत असलेल्या एका बेवारशी गायीच्या वारसाला ( Calf Off Cow). अखेर शिकेरी मये येथील गोशाळेत पोचवले. केरी - साखळी येथील मुख्य रस्त्यावर भटक्या गुरे रस्त्यावर बसत असतात. अशीच बसलेल्या एका दोन वर्षांच्या वासराच्या पायावरून गाडीचे चाक गेले होते.

घोटेली 1 , केरी येथे वासराला गाडीत भरते वेळी लीना गावस, गणेश विठ्ठल गावस, सरपंच दाऊद सय्यद, ज्ञानेश्वर मोरजकर
Goa Politics: ‘आप’मुळे भाजपची झाली गोची; वाचा सविस्तर

त्यामुळे ते वासरु जखमी झाले. पायावरून चाक गेल्याने पायाच्या तळव्याचे गेच मोडून त्यातून सतत रक्त वाहत होते. त्यानंतर जखमी अवस्थेतील वासरु त्या परिसरातील आरोग्य खात्यातील कर्मचारी असलेल्या लीना संजय गावस यांच्या घरा शेजारी आले. त्यानंतर लीना गावस ( Leena Gawas) यांच्या कुटुंबाने त्या वासराला दोन दिवस आसरा दिला व चाराही घातला. पण त्या वासराची जखम आणखी चिघळत असल्याने त्याला औषध उपचाराची गरज असल्याचे ओळखून त्यांनी त्याला गोशाळेत नेण्यासाठी प्रयत्न केले.

घोटेली 1 , केरी येथे वासराला गाडीत भरते वेळी लीना गावस, गणेश विठ्ठल गावस, सरपंच दाऊद सय्यद, ज्ञानेश्वर मोरजकर
Goa: जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडून आलो- विल्यिम फर्नांडीस

त्यानंतर त्यांनी याची माहिती केरी पंचायतीला दिली. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच दाऊद सय्यद ( Daud Sayyad) यांनी घटनास्थळी भेट देऊन वासराची पाहणी केली व शिकेरी- मये (Shikeri Mayem, Bicholim) येथील गोमंतक गौसेवक महासंघ (Gomantak Gousevak Mahasangh) गोशाळेत संपर्क साधून त्या वासराला पोहचवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर येथील त्या वासराला सुखरुपरीत्या गाडीमध्ये घालून गोशाळेत पोहचवले. या कामासाठी लीना गावस यांचे कुटुंबीय व केरी पंचायतींने सहकार्य लाभले. गोशाळेत त्या वासरावर औषध उपचार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com