Goa: सरकारने मांद्रे नदीचे काम हाती घ्यावे

भाऊसाहेबानी नदीची पाहणी करून बंधारे, कठडे बांधून शेतकऱ्यांना मदत केली होती (Goa)
Mandrem River (Goa)
Mandrem River (Goa)Nivrutti Shirodkar / Dainik gomantak
Published on
Updated on

मोरजी: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर (Goa's 1st CM Bhausaheb Bandodkar) यांच्या पुण्यतिथीचे (Death Anniversary) औचित्य साधून आम आदमी पार्टी (AAP), मांद्रे विभागाने मांद्रे गावातून वाहणाऱ्या मांद्रे नदी संवर्धनाचे (Conservation of Mandrem river) काम सरकारने हाती घ्यावे अशी मागणी केली आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या कार्यकाळात या नदीकडे गंभीरतेने लक्ष पुरवून, बंधारे उभारणे कठडे बांधण्यासाठी शेतकरी वर्गाना प्रोत्साहन दिले होते. मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे या नदीला अवकळा आली आहे. या नदीचे काम हाती घेवून भाऊसाहेबांचे शेतकऱ्या प्रती असलेले प्रेम सरकारने दाखवावे व या थोर नेत्यांचे खरे पुण्यस्मरण मांद्रे गावात राहील असे मांद्रेचे नेते प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.

Mandrem River (Goa)
Goa: गायन स्पर्धेत गोव्याचा हृषीकेश ढवळीकर द्वितीय तर आर्याला तृतीय पुरस्कार

मांद्रे गावात मधोमद मांद्रे नदी वाहते, आज या नदीला अवकळा आली आहे. मात्र नदीचे पात्र उथळ झाले आहे. पावसाळ्यात बाजूची शेती बुडते, तर उन्हाळ्यात उथळपणामुळे नदीचे पात्र कोरडे पडते. या नदीकडे लक्ष दिल्यास अनेक शेतकऱ्यांना लाभ होवू शकतो. भाऊसाहेबानी या नदीची पाहणी करून बंधारे उभारले होते.कठडे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. या नदीचे काम हाती घेतल्यास गावात पाणी मुबलक होईल. पुण्यातीथीचे औचित्य साधून आम आदमी पार्टी या नदी संदर्भात निवेदन सादर करून काम हाती घेई पर्यंत पाठ्पुरावा करेल असे आप पार्टीचे प्रसाद शहापूरकर यांनी माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com