Goa Heat Alert Extended: गोमंतकीयांनो काळजी घ्या, पुढचे 4 दिवस जरा जपून... उन्हाचा कडाका वाढणार

Goa temperature increase: बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावातून राज्यातील काही भागात काहीअंशी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावातून राज्यातील काही भागात काहीअंशी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस तापमान वाढ तसेच उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. पुढील चार दिवस राज्यात उन्हाचा कडाका वाढणार असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक भागांत वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, हवामानात झालेल्या या अचानक बदलानंतर आता गोव्यात उन्हाचा चटका अधिकच तीव्र होणार आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चार दिवसाचा यलो अलर्ट देण्यात हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Goa Weather Update
Goa Cabinet Decision: गोमंतकियांसाठी सुवार्ता! घर दुरुस्तीसाठी केवळ ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी, बीडीओंच्या पाहणीची आवश्‍यकता नाही, CM सावंतांनी दिली माहिती

गोवा राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाची हजेरी आणि त्यानंतर तीव्र उष्णतेची लाट अशा परिस्थितीमुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेच आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com