Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Goa Teachers Digital Toolkit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या गोवा दौऱ्यादरम्‍यान शिक्षकांना डिजिटल टूलकिटचे वितरण केले जाणार असल्‍याची माहिती शिक्षण खात्‍यातील सूत्रांनी दिली.
Goa Teachers Digital Toolkit
Goa Teachers Digital ToolkitDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍य सरकारकडून शिक्षकांना लवकरच डिजिटल टूलकिट देण्यात येणार असून, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कीबोर्ड आणि शिक्षण खात्‍याचे ॲप्लिकेशन्स व मजकूर प्रीलोड केलेल्या ५,१०० टॅब्लेटसाठी निविदा मागवण्‍यात आल्‍या आहेत. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षकदिनी याबाबतची घोषणा केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या गोवा दौऱ्यादरम्‍यान शिक्षकांना डिजिटल टूलकिटचे वितरण केले जाणार असल्‍याची माहिती शिक्षण खात्‍यातील सूत्रांनी दिली. शिक्षकांसाठी देण्‍यात येणाऱ्या डिजिटल टूलकिटची खरेदी इन्‍फोटेक महामंडळ करणार आहे. यात ८ जीबी रॅम असलेल्‍या ११ इंची उपकरणांची खरेदी करण्‍यात येणार आहे. ज्यात १२८ जीबी स्टोरेज असलेली पाच हजार आणि २५६ जीबी स्टोरेज असलेली १०० उपकरणे असतील.

Goa Teachers Digital Toolkit
Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

हार्डवेअरव्यतिरिक्त या निविदेत ॲप्लिकेशन्स, मजकूर आणि सुरक्षेच्या केंद्रीकृत व्यवस्थापनाची तरतूद आहे. ज्यामुळे खात्‍याला उपकरणे कॉन्फिगर आणि अपडेट करता येतील. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर आहे. प्रकल्प अहवालानुसार सर्व टॅब्लेट १५ ऑक्टोबरपर्यंत वापरासाठी तयार असणे आव‍श्‍‍यक असल्‍यामुळेच निविदा सादर करण्याची मुदत कमी ठेवण्यात आली आहे, असे महामंडळाने स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com