Goa: Taxi Meter न बसवण्यावर ठाम तर गोवा माईल्सहि रद्द करा: सुदीप ताम्हणकर

गोवा सरकारने (Goa Government) 32 कोटी रुपये खर्च करून राज्यातील टॅक्सीचालकांना (Goa Taxi Meter) मोफत मीटर बसवण्याची जी घोषणा केली आहे
Goa Taxi Meter: Still we are not agree says Taxi owner Organization
Goa Taxi Meter: Still we are not agree says Taxi owner OrganizationDainik Gomantak

पणजी: गोवा सरकारने (Goa Government) 32 कोटी रुपये खर्च करून राज्यातील टॅक्सीचालकांना (Goa Taxi Meter) मोफत मीटर बसवण्याची जी घोषणा केली आहे, या घोषणेला आता टॅक्सीमालक संघटनेचे प्रवक्ते सुदीप ताम्हणकर यांनी आव्हान दिले आहे. सरकारने गोवा माईल्स पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.(Goa Taxi Meter: Still we are not agree says Taxi owner Organization)

ताम्हणकर म्हणाले, गोवा माईल्स (Goa Miles) रद्द करावे ही टॅक्सीमालकांची मागणी आहे. मात्र, सरकार ती रद्द करू इच्छीत नाही. त्यामुळे जोपर्यंत गोवा माईल्स टॅक्सी सेवा रद्द होत नाही, तोपर्यंत टॅक्सींना मीटर बसवले जाणार नाही. मोबाईल ॲप आधारीत मीटर भाडे घेण्याची सवलत टॅक्सीमालकांना द्यावी. मोफत मीटर बसवण्याची सरकारची घोषणा म्हणजे केवळ धूळफेक आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Goa Taxi Meter: Still we are not agree says Taxi owner Organization
आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात येणारी मदत योजना आणखीन सुटसुटीत: मुख्यमंत्री

तर दुसरीकडे पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी टॅक्सींना डिजिटल मीटर व माहिती सेवा मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आजवर ज्या टॅक्सीमालकांनी मीटर बसवले आहेत, त्यांना खर्च केलेल्या रकमेचा परतावा दिला जाणार आहे. गोवा माईल्सच्या टॅक्सींनाही मीटर बसवले जाणार असून, टॅक्सीचालकांना बॅज व १५ वर्षांचा रहिवासी दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. टॅक्सींना दरवाढ लागू करून सर्वांचे दर समान केल्याने आता ग्राहक अमूक सेवेचीच टॅक्सी हवी, हा केवळ दरासाठी आग्रह धरणार नाहीत. असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडले आहे.

दरम्यान खासगी टॅक्सीमालकांच्या मागणीस अनुसरून टॅक्सींना डिजिटल मीटर विनाशुल्क बसवून देण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्याने याबाबत विविध समाजघटकांत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सरकारच्या निर्णयानुसार कदाचित मीटर लागतील. मात्र, गोव्यातील खासगी टॅक्सीमालक व चालकांच्या एकंदर कार्यपद्धतीमुळे पर्यटकांबरोबरच गोमंतकीय प्रवाशांनाही दिलासा मिळणार नाही, असे मत गोव्यातीलच काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Goa Taxi Meter: Still we are not agree says Taxi owner Organization
Goa Vaccination: राज्यातील 4 लाख 75 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण

पुण्या-मुंबईत आहे, मग गोव्यात का नाही?

पुण्या-मुंबईत गोव्यापेक्षा इंधनाचे दर जास्तच असले तरी तिथे डिजिटल मीटरबाबत वाहनचालक व ग्राहकांच्याही तक्रारी नाहीत. मग गोव्यातीलच टॅक्सीचालकांचा डिजिटल मीटरला विरोध का, असा सवाल काही गोमंतकीयांनी व्यक्त केला. गिरवडे येथील गुरुप्रसाद गावडे यांनी गोमंतकीय टॅक्सीचालकांकडून पिळवणूक होत असल्याचे मत व्यक्त केले. गोवा माईल्सच्या टॅक्सींनाही डिजिटल मीटर्स बसवण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोव्यात टॅक्सीचालकांवर अन्याय होण्याचे कारणच नाही, असेही ते म्हणाले.

तथापि, डिजिटल मीटर नेमके कोणत्या तारखेपर्यंत बसवण्यात येतील, ते त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com