Goa Taxi Issue: टॅक्सीचालकांचा एकजुटीनं विरोध; 'कॅब ॲग्रिगेटर' धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी 2 हजार 300 अर्ज दाखल

Goa Taxi Issue: राज्यातील पारंपरिक व स्थानिक टॅक्सीचालकांनी सरकारच्या प्रस्तावित ‘कॅब ॲग्रिगेटर’ धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी शेवटच्या दिवशीपर्यंत सुमारे २,३०० अर्ज दाखल झाले आहेत.
Goa Taxi Issue
Goa Taxi IssueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यातील पारंपरिक व स्थानिक टॅक्सीचालकांनी सरकारच्या प्रस्तावित ‘कॅब ॲग्रिगेटर’ धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी शेवटच्या दिवशीपर्यंत सुमारे २,३०० अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्यात असलेल्या टॅक्सीधारकांच्या तुलनेत वाहतूक खात्याकडे हरकतीसाठी आलेले अर्ज खूपच कमी आहेत.

त्यामध्ये केलेल्या सूचनांवर शक्य असल्यास विचार करून धोरणामध्ये समावेश केला जाईल, अशी माहिती वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली.

टॅक्सीचालकांनी आज सकाळी आपापल्या मतदारसंघांतील आमदार आणि मंत्र्यांची भेट घेऊन सरकारचे धोरण रद्द करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. सर्व

Goa Taxi Issue
Goa Government: अखेर अपमानास्‍पद हकालपट्टी! गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्‍चू, मुख्‍यमंत्र्यांवरील शिंतोडे पडले 'महागात'

भागधारकांकडून सूचना, हरकती, शिफारशी प्राप्त होण्याच्या उद्देशाने ही मसुदा मार्गदर्शक तत्त्वे अचूकपणे प्रकाशित करण्यात आली आहेत. त्‍यास अंतिम रूप देण्यापूर्वी विविध घटकांकडून प्राप्त झालेल्‍या सूचना, हरकती, अभिप्राय यांचा योग्य विचार सरकारकडून केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com