Subhash Shirodkar: अंजुणेतून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू

Subhash Shirodkar: शेतकरी, बागायतदारांत समाधान
Subhash Shirodkar |Goa News
Subhash Shirodkar |Goa News Dainik Gomanatk
Published on
Updated on

Subhash Shirodkar: शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असल्याची घोषणा जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दीड महिन्यापूर्वी पर्ये मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी केली होती. या घोषणेचे पालन करत मंत्री शिरोडकर यांनी आज पाण्याचा विसर्ग शेतीसाठी सुरू केला.

यामुळे शेतकरी, बागायतदारांत समाधान पसरले आहे. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यावेळी उपस्थित होत्या. यावेळी जलस्त्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता सालेलकर, धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंते राम गावस, सहाय्यक अभियंते दिलीप गावकर, सतीश सावंत, अभियंता अनिल फडते, शिवानंद गावकर आदींची उपस्थिती होती.

"सत्तरीतील शेतकरी बांधवांना वेळेवर पाणी मिळाले तर त्यांच्या शेती, बागायतीतून चांगले पीक येऊ शकते. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी याची विशेष दखल घेऊन वेळेवर पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार . तसेच भविष्यातही पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी खात्याने विशेष लक्ष द्यावे."

- डॉ. दिव्या राणे, आमदार

Subhash Shirodkar |Goa News
Goa Mine: एसआयटी खाण विभागाकडून 'लॉजिकल एन्ड' केसच्या कागदपत्रांची मागणी

"धरण प्रकल्पाच्या संपादित क्षेत्रामध्ये एकूण 16 पाणी वाटप संस्था आहेत. या संस्थांना मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते पाटबंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी रक्कम अदा करण्यात आली होती. यामुळे सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती पूर्ण झालेली आहे. आजपासून पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा गैरवापर होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी."

- दिलीप गावकर, सहाय्यक अभियंता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com