Goa Education: खोशयेची खबर! गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक संकल्पना आता कोंकणी भाषेत, वाचा सरकारची योजना

Konkani Shabdkosh For Goa Students: स्थानिक विद्यार्थ्यांना कोंकणी भाषेत वैज्ञानिक शब्दांचा वापर करत कठीण वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यात मदत मिळेल
Scientific Terms in Konkani: स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ भाषेत वैज्ञानिक शब्दांचा वापर करता येईल तसेच कठीण वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यात मदत मिळेल
Scientific Terms in KonkaniDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Konkani Language Science Shabdkosh for Students

पणजी: राज्यातील शिक्षण आणि भाषा विकासनाला चालना देण्यासाठी गोवा राज्य सरकराने वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोगासह (Commission For Scientific and Technical Terminology) एक करार केला आहे.

या सहयोगातून राज्य सरकारला गोव्यात कोंकणी शब्दकोश तयार करायचा आहे, ज्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ भाषेत वैज्ञानिक शब्दांचा वापर करता येईल आणि कठीण वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यात मदत मिळेल.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठ्या आनंदाने या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांच्या मते राज्यातील मुलांसाठी उपलब्ध झालेली ही एक चांगली संधी आहे, जी त्यांना उत्तम शिक्षण मिळवण्यात मदत करेल.मूळ भाषेतील शब्दकोश कठीण वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यात विद्यार्थ्यांची मदत करेल आणि परिणामी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव वृद्धिंगत होईल. शिवाय या उपक्रमामुळे राज्यात कोकणी भाषेला अधिक चालना मिळेल.

Scientific Terms in Konkani: स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ भाषेत वैज्ञानिक शब्दांचा वापर करता येईल तसेच कठीण वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यात मदत मिळेल
Suchana Seth Case: स्वतःच्या लहानग्या मुलाचा खून केलेल्या सूचना सेठचा जामिनासाठी पुन्हा प्रयत्न

कार्यशाळांचे आयोजन

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, राज्य सरकारने जनसंवाद/पत्रकारिता, रसायनशास्त्र, गणित, पर्यावरण अभ्यास, संगणक विज्ञान, प्राणीशास्त्र आणि कृषी यासह विविध विषयांचा समावेश असलेल्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत आणि येणाऱ्या काळात हा उपक्राम यशस्वी होण्यासाठी आणखीन उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. तसेच अशा उपक्रमांमुळे प्रादेशिक भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती, भाषांतर आणि संशोधनासाठी मदत होईल.

ग्रंथ अकादमीची स्थापना

कोकणी भाषा आणि साहित्याच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार गोव्यात ग्रंथ अकादमी स्थापन करण्याची शक्यता आहे, यामुळे राज्यातील शैक्षणिक संस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com