YIN Gomantak: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांबाबत राज्यातील विद्यार्थी म्हणतात...

गोव्याच्या नावावरही पदके; विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
YIN Gomantak | National Games Goa 2023
YIN Gomantak | National Games Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

National Games Goa 2023: गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अडचणींमुळे गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळत नव्हती. परंतु यंदा 37 व्या राष्ट्रीय क्रीडाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी आपल्या गोमंतभूमीला मिळाली आहे.

१८ ऑक्टोबरला सुरु झालेल्या या राष्ट्रीय खेळाचा औपचारिक उद्‌घाटन सोहळा नुकताच २६ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. राज्यात सगळीकडे जोशाचे वातावरण असताना राज्यातील तसेच बाहेरील खेळाडूंमध्ये उत्साह वाढविण्यासाठी सरकार यथाकाठ प्रयत्न करत आहे. परंतु तरीही काही त्रुटी राहत असल्यामुळे खेळाडूंचे मनोबल खचत आहेत.

तर दुसरीकडे काही गोवेकर खेळाडूंना पाठिंबा मिळत असल्यामुळे गोव्याच्या नावावरही काही पदके प्राप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया राज्यातील विद्यार्थ्यांचे मत.

YIN Gomantak | National Games Goa 2023
Goa Live Updates: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्थळांचे बांधकाम निकृष्ट, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार; चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

सध्या गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. तर या खेळामध्ये बऱ्याच वेळा फसवणूक केली जाते. गोवा हा भारताचा भाग असून देखील येथील मुलांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी क्वचित आहे. राष्ट्रीय स्पर्धा असल्या मुळे सगळ्याच राज्याच्या मुलांना समान हक्क मिळणे गरजेचे आहे. तर या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोव्याच्या खेळाडूंना प्रोत्साहन करून प्रवेश दिला पाहिजे.

मंजिता महादेव गांवस देसाई

मंजिता महादेव गांवस देसाई
मंजिता महादेव गांवस देसाईDainik Gomantak

संधी ही सर्वासाठी समान असली पाहिजे!

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा पाहिल्यादात गोव्यात होत असल्याने आपण सर्वांनांच या गोष्टींचा फार आनंद वाटत आहे पण याचं बरोबर खंत देखील वाटत आहे ती म्हणजे या गोष्टीची कि राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत भाग घेतलेल्या गोव्यातील काही खेळाडूंना विविध कारणे देऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली घेली जात नाही जे योग्य नाही. ज्याप्रमाणे अन्य राज्यातील खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते त्याच प्रमाणे गोव्यातील सक्षम खेळाडूंना देखील संधी देणे गरजेचे आहे.

साहीश्री नाईक, शिरोडा गोवा

 साहीश्री नाईक
साहीश्री नाईकDainik Gomantak

गोव्यातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्यावे

सद्या राज्यात राष्ट्रीय क्रीडा चालू आहेत ; त्यामुळे आपले अनेक खेळाडू प्रकाश झोतात आले आहे. काल परवा आपण ज्यांना ओळखत नव्हतो ते आपल्या गोव्याचे नाव मोठे करत आहेत. आपला गोवा क्रीडा क्षेत्रात मागे नाही हे चित्र आपल्या समोर आज येत आहे. या राष्ट्रीय क्रीडा मुळे गोव्याच्या खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली आहे, तसेच अश्या क्रीडा क्षेत्रात गोव्यातील खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात यावी व त्यांना आपली क्षमता दर्शविण्याची संधी द्यावी. येणाऱ्या काळात आपल्या गोव्यातील अनेक खेळाडू गोव्याचे तसेच भारताचे प्रतिनिधित्व करणार या दिशेने त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे.

आशिष नारायण परवार, वेर्ले, नेत्रावळी सांगे

आशिष नारायण परवार
आशिष नारायण परवारDainik Gomantak

खेळाडूंना अधिक प्रोत्साहन आवश्यक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमान राज्य म्हणून गोव्याच्या क्रीडा क्षेत्राला उभारी मिळणे आवश्यक होते. गोमंतकीय खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा व्यासपीठ खुले होईल या उद्देशाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रत्यक्षात गोव्याच्या खेळाडूंना डावलण्यात आल्याने या क्रीडा स्पर्धेच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच गोवा लहान राज्य असल्याने इथल्या खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.

अमेय अभय किंजवडेकर

अमेय अभय किंजवडेकर
अमेय अभय किंजवडेकरDainik Gomantak

पहिल्यांदा गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्यामुळे गोवा राज्याला नावलौकिकता मिळालेली आहे. गोव्यातील अनेक नवोदित खेळाडूंना नवीन ओळख मिळाली आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या मातीशी जोडलेला असल्यामुळे खेळाडू स्वतःसोबत आपल्या राज्याचे नाव काढतो. गोव्यातील अनेक खेळाडूंना बक्षिसे मिळाल्याने अनेक मुलांच्या मनात खेळाविषयीची आवड वाढताना दिसते. त्यामुळे अशा तऱ्हेच्या क्रीडा स्पर्धेत फक्त प्रशिक्षित केलेल्या खेळाडूंनाच नव्हे तर गोव्यातील प्रत्येक भागातील, खेड्या पाड्यातील, स्कूलातील मुलांची निवड करून प्रशिक्षित करावे. त्यांनाही आपली क्षमता दर्शवण्याची संधी द्यावी.

पूर्वा प्रसाद शिरोडकर, माध्येगाळ, काकोडा कुडचडे

पूर्वा प्रसाद शिरोडकर
पूर्वा प्रसाद शिरोडकरDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com