काही गोमंतकीय विद्यार्थी युक्रेन सीमेवर, तर काही शेजारी देशात स्थलांतरित

युक्रेनमध्ये एकूण 19 गोमंतकीय विद्यार्थी होते.
Russia Ukraine War News
Russia Ukraine War NewsDainik Gomantak

युक्रेन-रशिया युद्धाकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. युद्धातून (Russia Ukraine war) विदारक आणि दु:खदायक बातम्या देशाच्या वाटणीला येत असताना गोवेकरांसाठी दिलासादायक बातम्या मिळू लागल्या आहेत. (Russia Ukraine War News Update)

Russia Ukraine War News
'तिच्या' क्रोधीत EX प्रियकराने नव्या प्रियकराला धोपटलं, परस्परविरोधी गुन्हा दाखल

युक्रेनमध्ये एकूण 19 गोमंतकीय विद्यार्थी होते. त्यातील 6 जण सुखरूप गोव्यात (Goa) पोहोचले आहेत. एक विद्यार्थी आज दाखल होणार आहे. दोघांना रोमानिया, तिघांना हंगेरी, तर एकाला पोलंड देशात स्थलांतरित करण्यात आले आहे. दोघे खारकीवमध्ये असून त्यांना सीमेवर आणले जात आहे, तर 4 जण सीमेवर आहेत, मात्र त्यांचे ठिकाण अद्याप समजलेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Russia Ukraine War News
मुलाने रागातून केलेल्या मारहाणीत वडिलांचा दुर्देवी मृत्यू

युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी युक्रेन सोडले

मंगळवारी आपल्या घरी पोहोचलेल्या रेशल गोम्स हिने प्रत्यक्ष युद्धाला सुरवात होण्यापूर्वीच म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी आपल्या अन्य काही भारतीय विद्यार्थ्यांबरोबर युक्रेन सोडले होते. मात्र नंतर इतर सोपस्कार पूर्ण करायचे बाकी राहिल्याने त्यांना भारतात (India) यायला उशीर झाला. शेवटी शारजाह मार्गाने ती मंगळवारी गोव्यात पोहोचली.

रेशल गोम्स ही आपला वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी युक्रेनला (Ukraine) गेली होती. युक्रेनहुन गोव्यात पोहोचण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ती म्हणाली, आम्ही प्रत्यक्ष युद्ध (Russia and Ukraine War) सुरू होण्यापूर्वी युक्रेन सोडले होते. त्यामुळे आम्हाला फारसे काही त्रास झाले नाहीत. मात्र युद्ध सुरू होणार अशा बातम्या त्याहीवेळी येऊन धडकत होत्या. त्यामुळे आमच्या उरात धडकी भरली होतीच, असे ती म्हणाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com