Ponda News : कुर्टी पंचायतीला ‘प्रदूषण नियंत्रण’ची नोटीस

Ponda News : कचरा अंदाधुंदी प्रकरण ः प्लास्टिक बाटल्या जाळल्याच्या तक्रारी
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News : फोंडा कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रातील दीपनगर येथील ‘एमआरएफ’ या कचरा शेडमधील अंदाधुंदीवरून गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचायतीला नोटीस बजावली असून या नोटिशीत कारवाई का करू नये, असा सवाल उपस्थित केला आहे.

या कचरा शेडच्या बाहेर कचऱ्याबरोबरच प्लास्टिक बाटल्या जाळल्या जात असल्याने यासंंबंधीची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आली होती, त्याला अनुसरून मंडळाने या शेडची पाहणी करून कुर्टी - खांडेपार पंचायतीला आपले म्हणणे मांडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे.

कुर्टी - खांडेपार पंचायतक्षेत्रातील दीपनगर येथे असलेल्या या एमआरएफ शेडमध्ये कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटदाराकडून कचऱ्याला आग लावली जात असल्याने खांडेपार येथील एक सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते संदीप पारकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती.

या शेडमध्येच कामगारांची वस्ती असून जवळच असलेल्या लोकवस्तीत प्रदूषणाला वाव ठरणाऱ्या या तक्रारीनुसार गेल्या ३० ऑगस्टला प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांनी या कचरा शेडची तपासणी केली असता, त्यात प्लास्टिक जाळल्यामुळे प्रदूषण झाल्याच्या निष्कर्षाप्रत हे अधिकारी आले होते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीनुसार कमी प्रमाणात प्लास्टिक जाळले तर पाच हजार रुपयांचा दंड तर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जाळल्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

१५ दिवसांत म्हणणे सादर करा!

प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुर्टी - खांडेपार पंचायतीला पंधरा दिवसांच्या आत आपले लेखी म्हणणे प्रदूषण नियंत्रण मंडळाला द्यावे, असे नोटीशीद्वारे सूचवण्यात आले आहे. पंधरा दिवसांच्या आत पंचायतीने हे म्हणणे न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे.

Goa News
Goa Politics: आणखी काही मंत्र्यांवर पदत्यागाची टांगती तलवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com