Goa Tourism: हॉटेलमालकांना पर्यटकांची माहिती देणे बंधनकारक!

राज्य पर्यटन विभागाने पर्यटक नोंदणी गांभीर्याने घेतली आहे.
Goa Hotels
Goa HotelsDainik Gomantak
Published on
Updated on

State Tourism Department: राज्य पर्यटन विभागाने पर्यटक नोंदणी गांभीर्याने घेतली आहे. पर्यटकांची माहिती देणे नोंदणीकृत हॉटेलमालकांना बंधनकारक केले आहे. महिन्याकाठी ही माहिती न दिल्यास संबंधितास 50 हजारांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे पर्यटक खात्याने म्हटले आहे.

पर्यटन व्यवसाय 1985 च्या गोवा नोंदणी कायद्यात सुधारणा प्रस्तावित आहे. ज्यामुळे नोंदणीकृत हॉटेल व निवासी व्यवसाय चालविणाऱ्यांसाठी पर्यटक अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. संबंधितांनी सर्व माहिती न दिल्यास त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही.

Goa Hotels
Goa Dengue Spread : बार्देश तालुक्यात डेंग्यूचा फैलाव वाढताच

शिवाय या विषयाबाबत सबंधितांकडून 30 दिवसांच्या आत दुरुस्ती, सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. दुरुस्तीनुसार, हॉटेल व्यवसाय चालविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हॉटेल-इतर निवास युनिटमध्ये राहणाऱ्या पर्यटकांच्या तपशीलांसह महिन्याची आकडेवारी सादर करावी. अशी आकडेवारी ऑनलाईन पद्धतीने सादर केली जाईल.

Goa Hotels
Goa Politics: विरोध केल्यास 'त्‍यांना' माघारी पाठवणार आहे का?

राज्यात येऊन जास्त खर्च करणाऱ्या पर्यटकांसाठी गोवा पर्यटन धोरणानुसार 2024 पर्यंत वर्षभरातील सर्वात पसंतीचे ठिकाण बनवण्याची कल्पना आहे. त्यादृष्टीने पर्यटन खात्याने हे पाऊल उचलले आहे. गोवा पर्यटनाचे नियोजन, विकास आणि विपणन यासंबंधीच्या सर्व निर्णयांसाठी नवीन मंडळ नियुक्त करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com