Goa sanctuaries survey: संरक्षित क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करा; व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची शिफारस

3 अभयारण्यांचे 90 कर्मचाऱ्यांनी 5 दिवस केले सर्वेक्षण
Goa sanctuaries survey
Goa sanctuaries surveyDainik Gomantak

गोव्यातील 3 वन्यजीव अभयारण्यांचे सर्वेक्षण गेले पाच दिवस केले गेले, यामध्ये 90 कर्मचारी सहभागी असून दिवस - रात्र सलग हे काम सुरु आहे. आज हे सर्वेक्षण पुर्ण झाले असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आपल्या अहवालात गोव्यातील 700 चौरस किलोमीटर संपूर्ण संरक्षित क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. हे सर्वेक्षण व्याघ्र प्रकल्पातील जंगलाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आले.

(Goa state tiger reserve 3 sanctuaries surveyed by 90 staff for 5 days)

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ( Nation Tiger Conservation Authority (NTCA)) ने गोव्यातील संरक्षित क्षेत्रात व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोव्याच्या वन्यजीव संरक्षित भागात वन्यजीवांची संख्या कमी झाल्यामुळे शिकार कमी होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. सांबर आणि जंगली डुकरांची संख्या आवश्यक तितकी करण्यासाठी शिकारीवर नियंत्रणाची गरज आहे. असे तज्ज्ञांनी वनविभागाला सल्ला दिला आहे.

Goa sanctuaries survey
Goa Corona Update: गोव्यात रविवारी 30 नवे कोरोना रूग्ण, 41 जणांना डिस्चार्ज

वाघ शिकार करु शकणाऱ्या सस्तन प्राण्यांची कमतरता

हे सर्वेक्षण पायी आणि वाहनांद्वारे पार पडले. गोव्याच्या 3,700 चौ.कि.मी. क्षेत्रापैकी 20% संरक्षित असले तरी, अनेक दशकांपासून वन्यजीवांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच वाघ शिकार करु शकणाऱ्या सस्तन प्राण्यांची कमतरता असल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आले.

गोव्याच्या संरक्षित क्षेत्रात शिकार कमी असल्याने वाघांना कर्नाटक आणि महाराष्ट्रालगतच्या जंगलात जावे लागत असल्याचे वनविभागाच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. म्हादई वन्यजीव अभयारण्य, 208 वर्ग किमी क्षेत्रफळ असलेले, सर्वेक्षण केलेल्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक होते. त्याची पूर्व सीमा कर्नाटकातील भीमगड वन्यजीव अभयारण्यापर्यंत आहे. म्हादई हे गोव्यातील पहिले संरक्षित क्षेत्र होते जेथे कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ कैद झाले होते.

Goa sanctuaries survey
Vijay Sardesai: आमदार विकत घेण्यासाठी आलेला खर्च सरकार पाणी बिलातून उकळतय

किमान 200 वर्ग किमी क्षेत्र मानवापासून मुक्त करणे आवश्यक

या सर्वेक्षणात “आणखी एक समस्या आढळली, ती म्हणजे गोव्याच्या जंगलात मानवी वसाहती, जंगल भाग हा किमान 200 वर्ग किमी क्षेत्र मानवापासून मुक्त करणे आवश्यक आहे. यामूळे चितळांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. तसचे गोव्यात कुरणातील अधिवासही राखला जाणे आवश्यक आहे, या उपाययोजनांमुळे कमीत कमी दहा प्रजनन करणारे वाघ गोव्याला त्यांचे घर बनवतील, असे सूत्राने सांगितले.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिली माहिती

  1. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि मोलेमधील राष्ट्रीय उद्यान आणि गोव्यातील कोटिगाव वन्यजीव अभयारण्याच्या दक्षिणेकडील संरक्षित क्षेत्राचेही वन कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले.

  2. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने पश्चिम घाटाला देशातील पाच प्रमुख वाघांच्या अधिवासांपैकी एक म्हणून मान्यता दिली.

  3. गोव्यात, 2018 च्या राष्ट्रीय व्याघ्रगणनेद्वारे उत्तरेकडील सत्तरीपासून दक्षिणेकडील नेत्रावल्लीपर्यंत जाणाऱ्या घाटांचा संपूर्ण पट्टा वाघांच्या अधिवासाचा भाग म्हणून ओळखला गेला आहे.

  4. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आपल्या अहवालात गोव्यातील संपूर्ण संरक्षित 700 चौरस किलोमीटर क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे.

  5. प्राधिकरणाने म्हटले आहे की, हा गोवा आणि कर्नाटकच्या जंगलांमधील एक महत्त्वाचा मार्ग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com