Goa: ऑनलाईन शिक्षणात सुधारणा करा

सुदिन ढवळीकर : मगोचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन
Mgp Goa Agitation On Azad Maidan Panajim
Mgp Goa Agitation On Azad Maidan PanajimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यातील (Goa State ) ऑनलाईन शिक्षणात (Online Education) सुधारणा करा. ज्या भागात मोबाईलला रेंज (Mobile Network) मिळत नाही, तेथे रेंजसाठी व्यवस्था करा, गरीब विद्यार्थ्यांना मोफत मोबाईल प्रदान करा, आदी मागण्यांसाठी आज (मंगळवारी) मगो पक्षाने (Mgp) येथील आझाद मैदानावर (Azad Maidan) धरणे आंदोलन केले. आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात मगोचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी ढवळीकर म्हणाले, की मगो पक्षाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन १५ दिवसांत ऑनलाईन शिक्षणातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे मगो पक्षाला अनेक वर्षांनंतर आझाद मैदानावर येऊन आंदोलन करावे लागले. सरकारने ऑनलाईन वर्ग सुरू केलेत. मात्र, अनेक भागांत विद्यार्थ्यांना मोबाईलला रेंज (Mobile Network) मिळत नाही, तरी सरकार निद्रिस्त आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी सांगितले. भाजप सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप करून गरीब मुलांना सरकारने किंवा आमदारांनी मोबाईल प्रदान करावेत, अशी मागणी ढवळीकर यांनी केली.

Mgp Goa Agitation On Azad Maidan Panajim
Goa: खाण कामगारांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

राज्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता. (Goa Metrological) तरीही सरकारने उपाययोजना आखण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे राज्यात पूर आल्याचा आरोप ढवळीकर यांनी (Sudin Dhavalikar) यावेळी केला. पुरामुळे लोकांचे अतोनात नुसकान झाले आहे. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असे सांगून पूर येण्यासाठी काय काय कारणीभूत ठरले, याची योग्य चौकशी व्हावी, यासाठी आयोग स्थापन करावा व चौकशी करावी, अशी मागणी यावेळी ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी केली.

Mgp Goa Agitation On Azad Maidan Panajim
Goa: सचित बोरकर खून प्रकरणी लक्ष्मण चव्हाणला अटक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com