Instagram Reels : कॉलेजमध्ये ब्रेकअप, व्हीडिओमुळे अटक तरीही 'देसी गोवन' म्हणतो 'भिवपाची गरज ना; वाचा सविस्तर मुलाखत

एखादा चांगला कंटेंट द्यायचा असेल तर त्यासाठी चांगली स्क्रिप्ट, दर्जेदार शूटिंग आणि व्यवस्थित एडिटिंग केले तरच इन्स्टाग्रामवर तुमचे व्हिडिओ चालतात आणी फोलोवर्स वाढतात.
Mufeez Khan 'Desi Goan'
Mufeez Khan 'Desi Goan'Dainik Gomantak

२०१९ मध्ये फेसबूक ने इन्स्टाग्राम रील्सची सुरवात केली होती. त्यावेळी ती फक्त काही देशामध्येच रिलीज झाली होती. साधारण वर्षभराने सर्वांसाठी पूर्णपणे जारी केले. इन्स्टाग्राम रील्स सध्या पैसे कमावणारे एक चांगले अॅप ठरत आहे.

सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम रील नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतात. अनेकजण फक्त हौसेपोटी कींवा मनोरंजनासाठी रील बनवितात परंतु यापासून मोठी कमाईदेखील होऊ शकते. इन्स्टाग्रामवर रील करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गोव्यातही असे कंटेंट क्रिएटर आहेत त्यापैकी मुफिज खान याने 'गोमंतक' शी केलेली खास बातचीत.

Mufeez Khan 'Desi Goan'
गोव्याचा बरोजगारी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त; श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची आलेमाव यांची मागणी

सुरवात कुठून व कशी झाली गोव्यात??

‘देसी गोवन’ हे नाव सर्वांच्याच ओळखीचे आहे. मी कुडचडे येथे राहतो आणि इन्स्टाग्रामवर ‘देसी गोवन’ या नावाने व्हिडिओ कंटेंट बनवितो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतल्यावर गोव्यातील एका कंपनीसाठी मी सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजर म्हणून ६ महीने काम पाहिले. या दरम्यान इंजिनिअरिंगच्या पहिल्याच वर्षात असताना रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप झाल्याने मी इन्स्टाग्रामवर रील्स बनवायला सुरवात केली.

गेली तीन वर्षे मी इन्स्टाग्रामवर बनवीत असलेले कंटेंट लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. १६ मार्च २०२० रोजी माझा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. सुरवातीला हिंदीमध्ये कंटेंट बनवायला सुरवात केली होती पण नंतर स्वतः गोवेकर असल्याने आपल्या गोव्याची विशेषता असणाऱ्या कोंकणी भाषेत व्हिडिओ करायचे मी ठरविले.

Mufeez Khan 'Desi Goan'
अभिमानास्पद! ‘बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन’ पुरस्काराने गोवा सन्मानित; बीच, मल्टीस्टार हॉटेल्सची जोडप्यांना भुरळ

कंटेंट बनविताना कोणते अडथळे येतात??

सुरवातीला जेव्हा रील बनविण्याचे ठरविले तेव्हा कुटुंबाकडून हवा तसा पाठिंबा मला नाही मिळाला. नातेवाईकांनी सुद्धा टोमणे मारले. पण जेव्हा घरी पैसे आणून द्यायला लागलो तेव्हा त्यांना विश्वास बसला की असे व्हिडिओ करून बऱ्यापैकी कमाई होऊ शकते.

‘भिवपाची गरज ना’, ‘हू इज सिमरन’, ‘माचो’ हे माझे व्हीडिओ सर्वांच्या पसंतीस आले. एका वादग्रस्त कंटेंटसाठी पोलिसांनी मला अटकही केली होती. कंटेंट बनविण्याचा नादात पाय फ्रॅक्चर होण्याचे प्रकारही माझ्यासोबत घडले आहेत. तसेच मनाली सारख्या थंड ठिकाणी कमी कंपड्यांमध्ये रील बनविणे आपल्या जीवाशी आले होते. गेल्या ३ वर्षात कंटेंट बनविताना मी खूप काही अनुभवले आहे.

चांगला कंटेंट कसा बनविला जातो??

एखादा चांगला कंटेंट द्यायचा असेल तर त्यासाठी खूप विचार करावा लागतो, मग त्यावर स्क्रिप्ट लिहिली जाते, त्याचं शूटिंग होऊन व्यवस्थित एडिटिंग केले जाते. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवावे लागते तरच इन्स्टाग्रामवर तुमचे व्हिडिओ चालतात आणी फोलोवर्स वाढतात.

कंटेंट बनविण्यासोबतच प्रोमोशनल व्हिडिओ देखील मी करतो कारण त्यातून पैसे मिळतात. महिन्याचा खर्च भागविण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी क्वालिटी कंटेंट सोबत असे प्रोमोशनल व्हिडिओ करणे आवश्यक असते.

कंटेंट क्रिएटर च करिअर कसं असतं??

सोशल मिडियावर मोठ्या व्हीडिओ पेक्षा शॉर्ट कंटेंट जास्ती चालतात. क्वालिटी कंटेंट देणे हेच माझे पहिल्यापासून प्राध्यान राहिले आहे. यामध्ये तरुणांना करिअर करण्याकरीता खूप स्कोप आहे त्यासाठी आधी चांगले कंटेंट बनविता आले पाहिजे.

‘देसी गोवन’ चे सर्व व्हिडिओ मि एकटाच करतो त्यासाठी वेगळी टीम नाहीये. आपले कंटेंट बघून आपल्याला ‘लुप लपेट’ या वेब सिरिजमध्ये छोटीशी भूमिकासुद्धा केली आहे. त्याचबरोबर अजून एका वेब सिरिजचे काम सध्या चालू आहे.

पुढे काय करण्याची इच्छा आहे???

आपल्या गोव्याची कोंकणी भाषा आणि कोंकणी फिल्म इंडस्ट्री साठी काहीतरी करण्याची माझी खूप इच्छा आहे. अभिनय क्षेत्रात मोठी संधि मिळाल्यास नक्कीच कोंकणीसाठी काहीतरी करीन. गोव्यातील कलेला आणि कलाकाराला स्थानिक लोकांच्या पाठिंब्याची खूप आवश्यकता आहे जी सध्या खूप कमी प्रमाणात मिळतेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com