अभिमानास्पद! ‘बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन’ पुरस्काराने गोवा सन्मानित; बीच, मल्टीस्टार हॉटेल्सची जोडप्यांना भुरळ

दिल्ली येथे गोवा पर्यटनाला ‘वेडिंग डेस्टिनेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Goa Wedding Venues
Goa Wedding VenuesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Wedding Venues: सर्वोत्कृष्ट उपलब्ध पायाभूत सुविधा, मल्टीस्टार भव्य हॉटेल्स, वेडिंग प्लॅनर आणि उत्तम वाहतूक सुविधा यामुळे गोवा पर्यटनाला दिल्लीत सर्वोत्कृष्ट ‘वेडिंग डेस्टिनेशन’ पुरस्कार मिळाला.

गेल्या आठवड्यात दिल्ली येथे एका भव्य कार्यक्रमात, गोवा पर्यटनाला खास ‘वेडिंग डेस्टिनेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी गेविन डायस आणि दीपक नार्वेकर यांनी स्वीकारला.

नंतर, जीटीडीसी (हॉटेल्स) चे महाव्यवस्थापक गेविन डायस यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की पर्यटक गोव्याला सर्वोत्तम सुट्टीचे ठिकाण म्हणून पसंत करतात. कारण इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.

डायस पुढे म्हणाले की, गोवा सर्वोत्तम वेडिंग डेस्टिनेशन म्हणून निवडले आहे, कारण गोव्यात उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत.

सर्वोत्तम विवाह नियोजक आहेत जे तुमचे लग्न आयुष्यभराचा अद्वितीय अनुभव असा भव्य करू शकतात. इथे राज्यातील वाहतूक सुविधा उत्तम आहे. येथील दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ पणजीपासून जवळ आहेत.

अधिक तपशील देताना, डायस यांनी खुलासा केला की, गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने, गोव्यात लग्नाची योजना करणारे बरेच लोक इतर पर्यटनाच्या बाबींवर पैसे खर्च करण्याचा विचार करतात. लग्नासाठी येणारे पर्यटकही येथे पैसे खर्च करतात. ज्यामुळे गोव्याला रोजगार मिळतो आणि महसूल मिळतो, असे गेविन पुढे म्हणाले.

अनेकांचे गोव्याच्या किनाऱ्यांवर लग्न करणे हे एक स्वप्न असते. त्यामुळे श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक मुद्दामहून गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर लग्न करायला येतात.

तसेच गोव्यात किनाऱ्यावरील बहुतेक तारांकित हॉटेल्समध्ये १०० ते २०० खोल्या सहज उपलब्ध असतात. या कारणामुळे १०० किंवा ५०० उपस्थितीचे विवाह सोहळे पद्धतशीरपणे पार पाडले जातात. या सर्व कारणांमुळे लोक गोव्यात लग्नसमारंभ आयोजित करायला प्राधान्य देतात.

- वैभव कळंगुटकर,`इव्हेंट बास्केट'चे मालक

Goa Wedding Venues
Mhardol Jasmine Farming: फुलं कोमेजली, रोजगार हिरावला! म्हार्दोळातली जाईशेती उद्ध्वस्त करण्यामागे बिल्डर लॉबीचा हात?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com