Goa Crematorium Issue : स्मशानभूमी नसलेले असेही एक गांव

राज्यात जवळपास ४३ स्मशानभूमींची गरज असल्याचे मुंबई उच्चन्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या एका PIL द्वारे माहिती प्राप्त झाली आहे.
Hindu Crematorium
Hindu CrematoriumDainik Gomantak
Published on
Updated on

हल्लीच डिचोली तालुक्यातील मेणकुरे गावात एक घटना घडली. एक मृत पावलेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यापासून त्याच्या कुटुंबीयांना रोखण्यात आले. थोडे ताणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मग पोलिसांना पाचरण करून घेतले गेले तरीही तिढा सुटेना. नंतर सरपंच, मामलेदार, स्थानिक संगळ्यांनीच हजेरी लावली.

ह्या अडवणुकीमागचे कारण असे की त्या गावात सार्वजनिक स्मशानभूमी नाहीये. सर्वजण आपापल्या मालकीहक्काच्या जागेत अंत्यविधी करतात. त्या मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची स्वतःची जागा नसल्याने हा तणावपूर्ण प्रसंग निर्माण झाला होता. बऱ्याच वेळेनंतर माणुसकीचे भान ठेवत गावातील एक महाजन कुटुंबियांनी आपल्या मालकी हक्काच्या जागेत अंत्यविधी केला.

Hindu Crematorium
Gomantak Whatsapp Channel: वाचकांच्या सेवेसाठी आता 'दै. गोमन्तक'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल! फॉलो करा या सोप्या स्टेप्स

पण शेवटी स्मशानभूमीचा प्रश्न उरतोच. राज्यातील काही गावांमध्ये हा प्रश्न अजून भेडसावत आहे. स्थानिक गावकऱ्यांपेक्षा जे परप्रांतीय तिथे येऊन स्थायिक झालेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बाब आहे. गावात एकतरी सार्वजनिक स्मशानभूमी हवी अशी सर्वांचीच इच्छा आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे अंत्यसंस्कार करण्याचे भिन्न भिन्न प्रकार प्राथमिक अवस्थेपासून आपल्या संस्कृतीत संगीतले गेले आहेत. पैकी स्वतःच्या हक्काच्या परिसरात किंवा शेतात अग्नि देण्याची जुनी प्रथा आहे.

Hindu Crematorium
गोव्यात अजुनही तब्बल 600 बसेसचा तुटवडा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण...

जुन्या काळात अशाच प्रकारे रानावनात नेऊन किंवा स्वतःच्या मालकीच्या जागेत अग्नि दिला जायचा. कालांतराने राज्यात सर्वत्र स्मशानभूमी बांधण्यात आल्या. परंतु काही गावात अजूनही स्मशानभूमि नसल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

काही ठिकाणी कोमुनिदाद किवा नगरपालिकेच्या सार्वजनिक स्मशानभूमीची सोय आहे. परंतु आजही राज्यात जवळपास ४३ स्मशानभूमींची गरज असल्याचे मुंबई उच्चन्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केलेल्या PIL द्वारे माहिती प्राप्त झाली आहे.

राज्यात वाढत्या परप्रांतीय लोकांची संख्या बघता प्रत्येक गावासाठी किमान एक सार्वजनिक स्मशानभूमीची गरज भासू शकते. किंवा त्याला पर्याय म्हणून आधुनिक पद्धतीने तयार केली गेलेली विद्युतदाहिनी (Electric Cremation) असावी.

१५०० लोकवस्ती असलेल्या ह्या गावात अजून सार्वजनिक स्मशानभूमी नाही. १९९७ मध्ये पंच असताना एक राखीव जागा बघितली गेली होती पण काही कारणास्तव ते प्रकरण कोर्टात गेले आणि अजूनही त्यावर निकाल झालेला नाहीये. माणुसकीच्या दृष्टीने कोणीतरी पुढे येऊन जागा दिल्यास गावासाठी एक सार्वजनिक स्मशानभूमी होऊ शकते

गुरुदास परब, सरपंच, मेणकुरे

भारतीय घटनेमध्ये सांगितले गेले आहे की प्रत्येक व्यक्तीची मेल्यानंतर सन्मानपूर्वक अंत्यविधी होणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रत्येक गावात एक सार्वजनिक स्मशानभूमी असायला हवी. गावातील महाजनांना स्वतःच्या मालकीची जागा आहे परंतू इतर कुटुंब आणि परप्रांतीयांसाठी सार्वजनिक स्मशानभूमीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक गावात सार्वजनिक स्मशानभूमीसाठी एक जागा राखीव ठेवावी

संतोष आंदुर्लेकर, वकील, मेणकुरे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com