Goa Ganesh Chaturthi 2023: चवथीचा बाजार आता स्विगीवर! घरातूनच मागवा मोदक, लाडू, नेवरी अन् खूप काही...

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा चवथ ई-बाझारचे अनावरण केले.
Goa Ganesh Chaturthi 2023 | E-Chavath Bajar
Goa Ganesh Chaturthi 2023 | E-Chavath BajarDainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा चवथ ई-बाजारचे अनावरण केले. यामध्ये राज्यातील स्थानिक महिला उद्योजक आणि स्वयं-सहायता गटांच्या उत्पादनांची यादी 'स्विगी मिनीस' वर करण्यात आली आहे.

स्विगीच्या प्लॅटफॉर्मद्वारे 25 वस्तू आता ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि महिला बचत गटांना (SHG) पाठिंबा देणे हे या ई-बाजारचे उद्दिष्ट आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023 | E-Chavath Bajar
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नाक्यांवरील गस्त वाढवावी; डीजीपींचे निर्देश

त्यांना सणासुदीच्या काळात हजारो ग्राहकांपर्यंत स्विगीच्या माध्यमातून पोहोचता येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि स्विगीच्या डॉली सुरेखा यांच्यात सामंजस्य करार झाला.

Swiggy 16 सप्टेंबरपासून Swiggy Minis वर एक खास ई-चवथ बाजार विभाग तयार करणार आहे; जिथे ग्राहक सणासुदीच्या खास घरगुती मिठाई जसे की मोदक, नेवरी, लाडू तसेच गोव्यातल्या घरांमध्ये बनणाऱ्या गोष्टी म्हणजे चकल्या, पापड, फरसाण, मसाला, लोणचे यांसारखे पदार्थ खरेदी करू शकतात.

या सामंजस्य कराराबाबत बोलताना, स्विगीचे सह-संस्थापक नंदन रेड्डी म्हणाले की, हा उपक्रम ग्राहकांसाठी सुलभता आणि सुविधा वाढवणारा आहे. तसेच गोव्यातील स्थानिक महिला उद्योजकांशी जोडण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.

परंपरा आणि तंत्रज्ञानाला जोडून, ते उद्योजकांना, विशेषत: महिला आणि स्वयं-मदत समुदायांना, आपली संस्कृती जपण्यासाठी आणि गणेश चतुर्थी दरम्यान गोव्यातील मिठाई आणि खाद्यपदार्थ विकून आर्थिक विकासाला चालना देण्याचे आमचे ध्येय आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.

या सामंजस्य करार कार्यक्रमाचे आयोजन महिला आणि बालकल्याण विभागाने केले असून यामध्ये राज्यभरातील महिला उद्योजकांना एकत्र आणले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com