ST Reservation: एसटी आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु; राजधानीत आंदोलकांचा ठिय्या

ST Reservation: आरक्षणासंबंधीची अंतिम अधिसूचना जारी करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता.
ST Reservation
ST ReservationDainik Gomantak
Published on
Updated on

ST Reservation: अनुसूचित जमातीला विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे,या मागणीसाठी एसटी नेत्यांनी आजपासून आझाद मैदानावर आज बुधवारपासून साखळी उपोषणाला प्रारंभ केला.

रविवारी एसटी नेत्यांनी सरकारला आरक्षणासंबंधीची अंतिम अधिसूचना जारी करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता.

या संदर्भात सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून संतप्त एसटी नेत्यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.

यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करू,असे आश्‍वासन दिले. तसेच सरकारला याबाबतीत निर्णय घेण्यास काहीकाळ लागू शकतो,त्यामुळे एसटी नेत्यांनी समजून घ्यावे,असेही सांगितले.

गोव्यातील अनुसूचित जमातीसाठीच्या (एसटी) राजकीय आरक्षणाची अधिसूचना केंद्र सरकारने जारी न केल्यास पणजीतील आझाद मैदानावर येत्या 6 मार्चपासून उपोषण छेडण्याचा इशारा मिशन पॉलिटिकल फॉर एसटी रिझर्व्हेशन संघटनेचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी दिला होता.

केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार आश्‍वासने देऊन फसवणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa politics Marathi language issue
Amit Patkar Congress Criticism PM Modi
Sudin Dhavalikar MGP statement
BJP strategy for Goa elections
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com