सतीश-चेतन रेनफॉरेस्ट चॅलेंजचे विजेते; गोमंतकीयांचीही चमक

सेड्रिक-अॅस्टर, दत्तराज-सिद्धेश पहिल्या पाचांत
Goa Sports News
Goa Sports NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कर्नाटकच्या सतीश कुमार (सहचालक चेतन चेंगप्पा) याने रेनफॉरेस्ट चॅलेंज इंडिया ऑफरोड मोटरस्पोर्टस विजेतेपद मिळविले. गोव्यातील जंगल, चिखलमय भागातील कच्च्या मार्गावर स्पर्धा झाली.

Goa Sports News
संसद भवनासाठी माती गोळा करण्यावरुन अमरनाथ पणजीकरांची भाजपवर टीका

स्पर्धेत गोमंतकीय ऑफरोड ड्रायव्हरनीही चमक दाखविली. सेड्रिक दा सिल्वा (सहचालक अॅस्टर डायस) व दत्तराज राऊत देसाई (सहचालक सिद्धेश नाईक) यांनी पहिल्या पाच जणांत स्थान मिळविले. दिल्लीस्थित कुगर मोटरस्पोर्टस यांच्यातर्फे स्पर्धा घेण्यात आली.

सतीश-चेतन यांचे हे एकत्रितपणे पहिलेच रेनफॉरेस्ट चॅलेंज विजेतेपद ठरले. यापूर्वी 39 वर्षीय चेतन याने 2018 व 2019 मध्ये सहचालक या नात्याने जेतेपद प्राप्त केले. मात्र 36 वर्षीय सतीश पहिल्यांदाच विजेता ठरला.

चंडीगडचा कबीर वरैच (सहचालक दुष्यंत खोसला) याने उपविजेतेपद मिळविले, तर हैदराबादचा एन. अभिनव रेड्डी (सहचालक विषुथी वरुण) तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. कबीर-दुष्यंत गतवर्षीचे विजेते होते. सतीश-चेतन सुरवातीचे तीन दिवस दुसऱ्या स्थानी होते, नंतर त्यांनी मुसंडी मारली.

यश विलक्षण : सतीश

सतीश-चेतन यांनी देशातील ही खडतर ऑफरोड मोटरस्पोर्टस स्पर्धा जिंकताना 25 विशेष टप्प्यांत 2500 पैकी 1895 गुण नोंदविले. या स्पर्धेत अव्वल ठरल्यामुळे सतीश आता मलेशियात वर्षअखेरीस होणाऱ्या मुख्य रेनफॉरेस्ट चॅलेंजसाठी थेट पात्र ठरला आहे.

बंगळूरस्थित वास्तुविषारद असलेल्या सतीश सांगितले, की ``हे यश विलक्षण आहे, जे मी शद्बांत व्यक्त करू शकत नाही. विजेतेपदासाठी 2014 पासून सात वेळा प्रयत्न केले, अखेर यंदा पोडियम मिळविण्यात सफल ठरलो. सध्यातरी जगातील सर्वोच्च ठिकाणी असल्याची भावना अनुभवतोय.`` हे खडतर मेहनतीचे फळ असल्याची प्रतिक्रिया सहचालक चेतन याने दिली.

रेनफॉरेस्ट चॅलेंजमधील पहिले 5

- सतीश कुमार – चेतन चेंगप्पा (कर्नाटक) : 1895 गुण

- कबीर वरैच – दुष्यंत खोसला (चंडीगड) : 1825 गुण

- एन. अभिनव रेड्डी – विषुथी वरुण (हैदराबाद) : 1734 गुण

- सेड्रिक दा सिल्वा – अॅस्टर डायस (गोवा) : 1631 गुण

- दत्तराज राऊत देसाई – सिद्धेश नाईक (गोवा) : 1585 गुण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com