Women's Cricket: गोव्याच्या महिलांची जम्मू-काश्मीरवर मात

Women's Cricket: ठाणे-महाराष्ट्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सामना झाला.
Purva Bhaidkar
Purva BhaidkarDainik Gomantak

Women's Cricket: सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केलेल्या पूर्वा भाईडकर याच्या लाजवाब अष्टपैलू कामगिरीच्या बळावर गोव्याच्या 23 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने बुधवारी एकतर्फी विजयाची नोंद केली. त्यांनी अ गटात जम्मू-काश्मीरला १०० धावांनी हरविले.

ठाणे-महाराष्ट्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सामना झाला. जम्मू-काश्मीरने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले.

ओडिशाविरुद्धच्या विजयात मागील लढतीत नाबाद ६८ धावा केलेल्या पूर्वा भाईडकर हिने ७३ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. त्यामुळे गोव्याला ८ बाद २०९ धावा करणे शक्य झाले.

पूर्वाने दिव्या नाईक (२३) हिच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची, तर तनया नाईक (३५) हिच्यासह पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली.

त्यापूर्वी, कर्णधार पूर्वजा वेर्लेकर (२८) व कृपा पटेल (१८) यांनी ४८ धावांची दमदार सलामी दिली होती. नंतर पूर्वा भाईडकर (४-१९) व पूर्वजा वेर्लेकर (३-१५) यांनी जम्मू-काश्मीरला ८ बाद १०९ धावांतच रोखले.

संक्षिप्त धावफलक

गोवा: ५० षटकांत ८ बाद २०९ (पूर्वजा वेर्लेकर २८, कृपा पटेल १८, मेताली गवंडर १, पूर्वा भाईडकर ६३, दिव्या नाईक २३, तनया नाईक ३५, इब्तिसाम शेख ४, खुशी बांदेकर ०, ऊर्वशी गोवेकर नाबाद १५, सेजल सातार्डेकर नाबाद ४, काजल भगत २-३८)

वि. वि.

जम्मू-काश्मीर: ५० षटकांत ८ बाद १०९ (शीना सराफ २२, अदिती आर्यन १६, खुशबू आफताब नाबाद ३०, पूर्वा भाईडकर १०-०-१९-४, मेताली गवंडर ६-१-१४-०, तनया नाईक ५-१-९-०, सेजल सातार्डेकर ७-२-१९-०, सिद्धी सवासे १०-२-१९-१, पूर्वजा वेर्लेकर ७-०-१५-३, कृपा पटेल ५-०-१३-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com