Indian Super League: निम दोरजी तमांगमुळे एफसी गोवाच्या बचावास आधार

Indian Super League: निम दोरजी तमांग दाखल: बाकी आयएसएल मोसमासाठी करारबद्ध
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League:

एफसी गोवाने 2023- 24 मधील बाकी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल मोसमासाठी बचावपटू निम दोरजी तमांग याला करारबद्ध केले आहे.

अनुभवी संदेश झिंगनच्या गंभीर दुखापतीच्या पार्श्वभूमीवर या नव्या करारामुळे संघाला आधार मिळाला.

निम दोरजी तमांग अनुभवी फुटबॉलपटू आहे. तो 28 वर्षांचा आहे. इंडियन एअर फोर्स अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या निम याने भारताच्या 16 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

आय-लीग स्पर्धेत तो मेघालयातील शिलाँग लाजाँग एफसीतर्फे खेळला, या संघाचे नेतृत्वही केले. आयएसएल स्पर्धेत एफसी पुणे सिटी, नॉर्थईस्ट युनायटेड या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले.

मानोलो मार्केझ प्रशिक्षक असताना तो हैदराबाद एफसी संघात दाखल झाला. मार्केझ आता एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

एफसी गोवा संघातील ओडेई ओनाइंडिया हैदराबाद संघात असताना बचावपळीत त्याची निम दोरजी याच्यासमवेत 2022-23 मोसमात चांगली जोडी जमली होती.

मार्केझ यांनी निम दोरजी याचे एफसी गोवा संघात स्वागत केले आहे. तो आक्रमक शैलीतील अनुभवी बचावपटू असून हवेतील चेंडूवर हुकमत राखतो, असे त्यांनी नमूद केले.

Indian Super League
Vasco Drugs Case: कांदोळी, हणजूण पाठोपाठ वास्कोत छापोमारी; परप्रांतियाकडून साठ हजाराहून अधिक रकमेचा गांजा जप्त

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com