Vijay Hazare Trophy: तमिळनाडूची गोव्यावर 33 धावांनी मात; सिद्धार्थ, स्नेहलचे प्रयत्न अपयशी

Vijay Hazare Trophy: ठाणे-महाराष्ट्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शनिवारी हा सामना झाला.
Vijay Hazare Trophy
Vijay Hazare TrophyDainik Gomantak

Vijay Hazare Trophy: के. व्ही. सिद्धार्थ याने आक्रमक फलंदाजी करताना विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, पण ते सफल ठरले नाहीत. त्याच्यासह स्नेहल कवणठकर यांचे अर्धशतकी प्रयत्न अपयशी ठरले. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या ‘ई’ गटात तमिळनाडूने गोव्यावर 33 धावांनी विजय प्राप्त केला.

ठाणे-महाराष्ट्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शनिवारी सामना झाला. सलामीचा फलंदाज बी. साई सुदर्शन याच्या शानदार शतकाच्या बळावर तमिळनाडूने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर 8 बाद 296 धावा केल्या.

सुदर्शन याने 144 चेंडूंतील खेळीत 10 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 125 धावा केल्या. नंतर गोव्याचा डाव शेवटच्या षटकात 263 धावांत संपुष्टात आला. गोव्याचा हा सलग दुसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना मध्य प्रदेशने सात विकेटने हरविले होते.

Vijay Hazare Trophy
Garbage Issues In Goa: म्हापसा- शिवोली रस्त्यानजीक चिकन मार्टच्या कचऱ्याचे ढीग; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

गोव्याच्या डावात अगोदर स्नेहल कवठणकर याने संयमी अर्धशतक करताना ९४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा केल्या. त्याने कर्णधार दर्शन मिसाळसह चौथ्या विकेटसाठी ६४ धावा केल्या. मात्र फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेल्याने गोव्याची स्थिती ४३.४ षटकांत ७ बाद १९९ अशी झाली.

प्रतिकुल परिस्थितीत सिद्धार्थने किल्ला लढविला. त्याने मोहित रेडकर याच्यासमवेत आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली, यामध्ये सिद्धार्थचा वाटा ४१ धावांचा होता. चेंडू कमी बाकी राहिल्यामुळे गोव्यासाठी २९७ धावांचे आव्हान कठीण ठरले. सिद्धार्थाने ४८ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

तमिळनाडू:- ५० षटकांत ८ बाद २९६ (बी. साई सुदर्शन १२५, बाबा अपराजित ४०, विजय शंकर २४, बाबा इंद्रजित २४, दिनेश कार्तिक नाबाद ४७, अर्जुन तेंडुलकर १०-२-७०-२, लक्षय गर्ग ९-०-६१-१, विजेश प्रभुदेसाई १०-०-५८-०, मोहित रेडकर १०-०-५३-१, दर्शन मिसाळ १०-१-४४-२, दीपराज गावकर १-०-७-०)

गोवा:- ५० षटकांत सर्वबाद २६३ (ईशान गडेकर १३, स्नेहल कवठणकर ५५, सुयश प्रभुदेसाई १७, राहुल त्रिपाठी २६, दर्शन मिसाळ ३६, दीपराज गावकर ०, के. व्ही. सिद्धार्थ ६१, अर्जुन तेंडुलकर १६, मोहित रेडकर १८, लक्षय गर्ग ०, विजेश प्रभुदेसाई नाबाद १, संदीप वॉरियर २०-४, टी. नटराजन ६८-१, आर. साई किशोर ४३-३, बाबा अपराजित ५९-२).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com