Garbage Issues In Goa: म्हापसा- शिवोली रस्त्यानजीक चिकन मार्टच्या कचऱ्याचे ढीग; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

Garbage Issues In Goa: 50-60 प्लास्टिक बॅगा विखुरलेल्या अवस्थेत असल्याचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर फिरत आहेत.
Garbage Issues
Garbage IssuesDainik Gomantak
Published on
Updated on

Garbage Issues In Goa: गोव्यात वाढत्या शहरीकरणासोबत कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत असून म्हापसा- शिवोली (शिवाजी रोड) रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहेत. अंदाजे 2 किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर कचऱ्याच्या 50-60 प्लास्टिक बॅगा विखुरलेल्या अवस्थेत असल्याचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर फिरत आहेत.

या प्लास्टिक पिशव्यांमध्ये चिकन मार्ट मधला टाकाऊ कचरा, बियरचा बाटल्या, खराब शहाळी, कुजलेला भाजीपाला असे पदार्थ असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून या मार्गावरून लोकांना असह्ययपणे प्रवास करावा लागतोय.

पंचायत, म्हापसा पालिका आणि आरोग्य यंत्रणेने यावर गांभीर्यानने लक्ष घालण्याची आवश्यकता असून असे न झाल्यास साथीच्या आजारांसह अन्य रोग पसरण्याची भीती स्थानिकांनी केलीय.

Garbage Issues
Goa Road Accident: जंगली जनावराला वाचवण्याच्या नादात रेडीघाट येथे कारचा अपघात

धक्कादायक म्हणजे हा कचरा अशा अवस्थेत गेले 4 ते 5 महिने असून दिवसेंदिवस या जागेवर कचऱ्याच्या राशी वाढतच आहेत. भटकी गुरे भाजीपाला असलेल्या पिशव्या फाडून खात असल्याने त्यांच्या पोटात कचऱ्यासोबत प्लास्टिकही जात असल्याची एक वेगळीच समस्या तयार होतेय.

तसेच चिकन मार्ट मधला कचरा प्लॅस्टिकमध्ये बंद अवस्थेत महिनोनमहिने तसाच राहिल्याने त्यात जीवजंतू तयार होऊन दुर्गंधी पसरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या समस्येसोबतच रस्त्यानजीकची झाडे आणि रस्त्यावर येणारी झुडुपे यांमुळे वाहनचालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

रस्त्यालगतची झाडे- झुडुपे तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी केलीय.

तसेच म्हापसा-शिवोली रस्त्यानजीक वाढत जाणाऱ्या कचरा समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढून कचरा फेकणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिकांनी केलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com