Goa Cricket Association: गोव्याच्या रणजी संघात आणखी एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज

Goa Cricket Association: कर्नाटकविरुद्ध लढत 19 जानेवारीपासून म्हैसूर येथे, फेलिक्सची निवड
Goa Cricket Association
Goa Cricket AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket Association: कर्नाटकविरुद्धच्या आगामी रणजी करंडक क्रिकेट सामन्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) सीनियर निवड समितीने संघात आणखी एक वेगवान गोलंदाज जोडताना फेलिक्स आलेमाव याची निवड केली.

त्रिपुरा व चंडीगडविरुद्धच्या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघ होता, आता म्हैसूरला राज्याचा १६ सदस्यीय संघ रवाना होईल. सामना १९ जानेवारीपासून खेळला जाईल.

Goa Cricket Association
Nanda Lolayekar Trophy: 42 व्या नंदा लोलयेकर करंडक क्रिकेट स्पर्धेवर मडगाव क्रिकेट क्लबची मोहोर

जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी सोमवारी चंडीगडविरुद्धच्या अनिर्णित लढतीनंतर आगामी लढतीसाठी संघ जाहीर केला.

सोमवारी क्षेत्ररक्षण करताना सुयश प्रभुदेसाई याच्या हाताला चेंडू लागला, मात्र त्याची दुखापत गंभीर नसल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर सिद्ध झाले. चंडीगडविरुद्ध ७७ धावा केलेला के. व्ही. सिद्धार्थ क्षेत्ररक्षणास उतरला नव्हता.

त्यामुळे राखीव यष्टिरक्षक समर दुभाषी याने १६० षटके यष्टिरक्षणाची जबाबदारी पेलली. गोव्याच्या रणजी संघात पुनरागमन केलेला फेलिक्स २८ वर्षीय असून २५ सामन्यांत त्याने ५२ विकेट्स टिपल्या आहेत.

गोव्याचा संघ: ईशान गडेकर, मंथन खुटकर, सुयश प्रभुदेसाई, राहुल त्रिपाठी, के. व्ही. सिद्धार्थ, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), मोहित रेडकर, समर दुभाषी, अर्जुन तेंडुलकर, विजेश प्रभुदेसाई, लक्षय गर्ग, हेरंब परब, फेलिक्स आलेमाव, अमूल्य पांड्रेकर.

गुजरात गटात अव्वल

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात सोमवारी गुजरातने कर्नाटकवर सहा धावांनी विजय नोंदविला. आगरतळा येथे खराब हवामानामुळे तमिळनाडू व त्रिपुरा यांच्यातील सामना अनिर्णित (अपूर्ण) राहिला.

रेल्वेने अनिर्णित लढतीत पंजाबवर फॉलोऑन लादला. आता दुसऱ्या फेरीनंतर गुजरातचे १२, त्रिपुराचे ७, कर्नाटक व रेल्वेचे प्रत्येकी ६, गोव्याचे ३, चंडीगडचे २, तर तमिळनाडू व पंजाबचा प्रत्येकी १ गुण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com