Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

Sadhguru Foundation Goa event: वीरेन्द्र शर्मा, सत्गुरु फाउंडेशन अध्यक्षा अॅड. ब्राह्मीदेवीजी तसेच यूके आणि भारतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Goa Spiritual Festival 2026
Goa Spiritual Festival 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: सद्‍गुरू फाउंडेशन आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल २०२६’ ची घोषणा ब्रिटनच्या ऐतिहासिक हाऊस ऑफ कॉमन्स, ब्रिटिश संसद - लंडन येथे करण्यात आली. सदर स्पिरिच्युअल फेस्टिव्हल १९ ते २४ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत गोव्यात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात पद्मश्री सद्‍गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामी व पीस अॅम्बेसेडर राजराजेश्वर गुरुजी, हेड – इंटरनॅशनल सिद्धाश्रम शक्ति सेंटर, यांच्या पावन उपस्थितीत फेस्टिव्हलच्या माहिती पत्रकाचे खासदार गेरेथ थॉमस आणि सायमन एन. ओव्हन्स, हिज मॅजेस्टी किंग चार्ल्स यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Goa Spiritual Festival 2026
Spiritual Tourism: गोव्यात 'एकादशा तीर्थयात्रा' उपक्रम! प्रमुख 11 मंदिरांना देता येणार भेटी; आध्यात्मिक पर्यटनाला संजीवनी

या फेस्टिव्हला देश-विदेशातून मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. वीरेन्द्र शर्मा, सत्गुरु फाउंडेशन अध्यक्षा अॅड. ब्राह्मीदेवीजी तसेच यूके आणि भारतातील अनेक मान्यवर उपस्थित होते. लंडनमध्ये गोवा स्पिरिच्युअल फेल्टिव्हल २०२६ ची घोषणा होणे, ही गोव्याच्या दृष्टीने अभिमानाचे ऐतिहासिक पाऊल ठरले. गोव्याच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा जगासमोर सादर फेस्टिव्हलमध्ये सादर होणार आहे.

Goa Spiritual Festival 2026
Goa Spiritual Tourism: गोव्यात सुरु होणार 'आध्यात्मिक क्रूझ बोट'; सावंत सरकार देतेय शाश्वत पर्यटनाला चालना

विशेष दर्शनयात्रा

फेब्रुवारीत होणाऱ्या गोवा स्पिरिच्युअल फेस्टिव्हल २०२६ मध्ये समुद्र आरती, योग सत्रे, पारंपरिक संगीत, विविध कला आणि संस्कृतीचे कार्यक्रम, तसेच प्राचीन देवस्थानांची विशेष दर्शनयात्रा यांचा समावेश असणार आहे, ज्यातून गोव्याची आध्यात्मिक संस्कृती विश्वभर पोहोचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com