Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism : विठ्ठलदासवाडा किनारी अतिक्रमण सुरूच : पर्यटक घटले

Goa Tourism : लाकडी पलंग, टेबल्‍स घालून अडथळा; कारवाई करण्याची मागणी

Goa Tourism :

मोरजी, राज्यात पर्यटकांची संख्या घटत चालली आहे. याला कारणे अनेक असली तरी बेशिस्त पर्यटन हे सर्वांत मोठे कारण आहे.

विशेषतः किनारपट्टी भागात पर्यटन व्यावसायिकांकडून कोणतीही शिस्त पाळली जात नाही, उलट किनारपट्टीचा जीव घोटण्याचा प्रयत्न हे व्यावसायिक करतात असे चित्र अनेक ठिकाणी दिसते. मोरजीतील विठ्ठलदासवाडा येथील किनारा याचे एक द्योतक आहे.

या किनारी भागातील खासगी जागेत जी हॉटेल, शॅक्स, रिसॉर्ट आहेत, त्यांनी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शेकडो लाकडी पलंग, टेबल घालून किनारा अडवला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र या विरोधात कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच स्थानिक पंचायतीनेही याकडे दुर्लक्ष चालवले आहे.

Goa Tourism
Bicholim News : डिचोलीत रंगला ‘गोड गोड बोला’ सांस्कृतिक महोत्सव; महिलांचा प्रचंड प्रतिसाद

विठ्ठलदासवाडा किनारी भागात फेरफटका मारला तर व्यावसायिकांनी किनाऱ्यावर अतिक्रमण करत थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत पलंग आणि टेबल, खुर्च्या मांडून ठेवलेल्या दिसतात. गेल्या वर्षी पर्यटन खात्याने एका व्यावसायिकांवर कारवाई केली होती. परंतु पुन्हा अतिक्रमण वाढले आहे.

पर्यटनमंत्र्यांनी दिला होता इशारा

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी येथील दौऱ्यावेळी अतिक्रमणाविरोधात कारवाईचा इशारा दिला होता. मात्र आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. किनारी भागातील पर्यटनात शिस्त आणण्यास सरकार अपयशी ठरत आहे, असा आरोप करण्‍यात येत अाहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com