Goa Gold Mining: गोव्याच्या मातीत खरंच सोने, पण उत्खननाला 'ब्रेक'! जीएसआयच्या तपासणीत धक्कादायक खुलासा

Goa Gold mining Latest News: गोव्याच्या मातीत सोने आहे. परंतु, खाणींमधून काढण्याइतपत त्याची मात्रा नसल्याचा अहवाल ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ ने (जीएसआय) राज्य सरकारला सादर केला आहे.
Goa Gold mining Latest News
Goa Gold MiningDainik Gomantak
Published on
Updated on

सिद्धार्थ कांबळे

पणजी: गोव्याच्या मातीत सोने आहे. परंतु, खाणींमधून काढण्याइतपत त्याची मात्रा नसल्याचा अहवाल ‘जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ ने (जीएसआय) राज्य सरकारला सादर केला आहे. त्यामुळे खाण खात्याने लिलाव केलेल्या डंपमधून खनिज काढण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

‘खाण खात्याने लिलाव केलेल्या डंपमध्ये पाच लाख कोटींचे सोने असल्याचा दावा करीत, खनिज डंपचा लिलाव न करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी वैज्ञानिक नंदकुमार कामत यांनी केली होती. त्यानुसार, खाण खात्याने लिलावासाठी घेतलेल्या आणि लिलाव झालेल्या एकूण बारा डंपमधील खनिजांचा ‘जीएसआय’मार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

Goa Gold mining Latest News
Caste Census Goa: गोव्यात 1 नोव्हेंबरपासून जातनिहाय जनगणनेचा 'श्रीगणेशा'! 4,150 कर्मचारी मैदानात उतरणार; 30 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

गोव्यासह देशभरातील खनिज डंपमध्ये कोणत्या प्रकारची खनिजे आहेत? त्यात सोन्याचा अंश आहे का? हे शोधण्याचे काम केवळ ‘जीएसआय’ करीत असते. त्यानुसार या डंपमधील खनिजांचे नमुने ‘जीएसआय’ला पाठविण्यात आले होते. या नमुन्यांची चाचणी केली असता, बाराही डंपमध्ये सोन्याचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मापदंडापेक्षा खूपच कमी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या डंपमधून सोने काढणे परवडणारे नाही,’’ असे खाण संचालक नारायण गाड यांनी बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

राज्यातील खाण व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी खाण खात्याने एकूण २६ खनिज डंपचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातील १२ डंपच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, सहा डंप लिलाव जिंकलेल्यांना देण्यात आले आहेत. डंप लिलावाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सरकारला सुमारे २२० कोटी रुपयांपर्यंतचा महसूल प्राप्त होणार आहे.

Goa Gold mining Latest News
Goa Name Change Law: नाव बदलण्याचा कायदा गोव्याच्या अस्मितेसाठी धोक्याची घंटा? पारंपरिक गोमंतकीय नाव-आडनावांच्या संरक्षणावर मोठा प्रश्न

मापदंड काय?: आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार १०० कोटी कणांमध्ये सोन्याचे ५०० कण आढळल्यास किंवा एक टन मातीत अर्धा ग्रॅम सोने सापडल्यास त्या खनिज डंपमधून सोन्याचे उत्खनन करता येते. शिवाय ते परवडणारेही असते. परंतु, गोव्यातील बाराही डंपमधील मातीत सोन्याचे २५ पेक्षाही कमी कण आढळले आहेत. त्यामुळे ते परवडणारे नसल्याने या डंपमधून सोने काढता येणार नाही, असेही गाड यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com