Siolim News
Siolim NewsDainik Gomantak

Siolim News: शिवोली बामणवाडो मार्गावर आंब्याचे झाड कोसळून चारचाकीचे नुकसान

Siolim News: बुधवारी रात्री 1 च्या सुमारास अंदाजे दीडशे वर्षांपूर्वीचे आंब्याचे मोठे झाड रस्त्यावर पडल्याने रास्ता पूर्णतः बंद झाल्याची घटना घडली.
Published on

Siolim News: शिवोली बामणवाडो येथे बुधवारी रात्री 1 च्या सुमारास अंदाजे दीडशे वर्षांपूर्वीचे आंब्याचे मोठे झाड रस्त्यावर पडल्याने रास्ता पूर्णतः बंद झाल्याची घटना घडली.

या रस्त्यावर पार्क केलेल्या महाराष्ट पासिंगच्या एका चारचाकीवर हे झाड पडल्याने कारचे पूर्णतः नुकसान झाले.

सकाळी 7 वाजता पंच सदस्य संदेश हडफडकर यांनी अग्निशामकदलाला घटनेची माहिती दिल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले.

Siolim News
Sunset Cruise In Goa: 31st ला गोव्यात येताय? तर मग सनसेट क्रूझला जा केवळ 600 रुपयात

झाड मोडून पडल्याने लगतच्या वीज तारा तुटून अस्ताव्यस्त पडल्या होत्या. मात्र वीजखात्यानेही घटनास्थळी तातडीनं धाव घेत वीजपुरवठा पूर्ववत केला. दरम्यान या घटनेत एका स्थानिक रहिवाश्याच्या दगडी कुंपणाचे नुकसान झालंय.

ज्या ठिकाणी झाड पडलं तो रस्ता रहदारीचा असून शाळकरी मुलं, वयोवृद्ध माणसं तसेच छोटी वाहनांची या मार्गावर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे उपस्थित सर्वांनी सांगितले.

या कामी अग्निशामक दलाच्या प्रशांत शिरगांवकर, चालक स्वप्नेश, विष्णू केसरकर, विष्णू नाईक यांनी अथक परिश्रम घेतले. झाड जुनाट असून त्याचे खोड भलंमोठं असल्याने ते हटवण्यासाठी अग्निशामकने JCB मागविला असून सध्या रास्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com