Goa News : महालसा नारायणी विद्यालयातून सुसंस्कारी पिढीचे निर्माण : आर्लेकर

Goa News : वेर्णा येथे तैवानच्या खास पाहुण्यांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

कुठ्ठाळी, श्री महालसा नारायणी विद्यालय हे संस्कारांचे केंद्र ठरावे, जेणेकरून भविष्यात संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. संस्कारांचे खरे मर्म शिक्षण पद्धतीत दडले आहे.

या शाळेची स्थापना करून कमलाक्ष नायक आणि व्यवस्थापनाने गोमंतकीयांसमोर आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. सर्वांनी संस्कृती आत्मसात करून तिचे संवर्धन करूया, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

Goa
Goa Drug Case: तळघरात गांजाची लागवड; बोरीत तरुणाला अटक, 8.50 लाखांचे अमली पदार्थ जप्त

जुने म्हार्दोळ-वेर्णा येथील श्री महालसा नारायणी चॅरिटेबल ट्रस्ट, श्री महालसा नारायणी विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री महालसा नारायणी विद्यालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आर्लेकर यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष कमलाक्ष नायक, विद्यालयाचे चेअरमन आशिष प्रभूदेसाई, तैवानहून खास उपस्थित राहिलेले ‘डि-लिंक’ कंपनीचे माजी चेअरमन जाँन ली, माजी संचालक जेम्स याँग, ‘टेलिबाॅक्स तैवान’चे चेअरमन रे चाँग, जितेंद्र गोकर्णकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आर्लेकर म्हणाले की, ही शाळा शिक्षण क्षेत्रात नित्य उत्कर्ष करीत असून निश्चितच भविष्यात क्रांती घडवेल.

आशिष प्रभुदेसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रणय वेर्णेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. देविदास सराफ, अवधूत आर्सेकर, प्रशांत देशपांडे, सुहास वेर्णेकर, म्हाळसाकांत देशपांडे यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. आभार जितेंद्र गोकर्णकर यांनी मानले.

कॅनकॉंव यांचे महत्त्वपूर्ण योगदान

यावेळी कमलाक्ष नायक म्हणाले की, शाळेची ही वास्तू कीर्तीमान व्यक्तिमत्त्व कॅनकाँव यांच्या स्मरणार्थ अर्पण केली आहे. कॅनकाँव यांच्या सहकार्यामुळेच मी व्यवसायात यशस्वी झालो.

त्यांच्या सहकार्याने मी डि-लिंक, डिजिलिंक, स्मार्ट लिंक यासारख्या कंपन्या स्थापन करू शकलो, असे नायक म्हणाले. यावेळी जॉन ली यांनी आयोजकांचे आभार मानले. ते म्हणाले, गरिबांना मदत करण्यात कॅनकाँव यांचे मोठे योगदान होते.

राज्यपाल आर्लेकरांचा सन्मान

यावेळी कमलाक्ष नायक यांनी राज्यपाल आर्लेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. यावेळी जॉन ली, जेम्स याँग, रे चांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com