पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पणजीतील सभेला संबोधित करताना, 'गोव्यात दिल्लीची दादागिरी चालणार नाही, म्हणत पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Modi) निशाणा साधला. ''दिल्लीहून गोव्याला कोणीही कंट्रोल करु शकत नाही. गोव्यावर बाहेरच्या व्यक्तीचे नव्हे तर गोवेकरांचेचं नियंत्रण असावे, म्हणत गोवा दौऱ्यात ममता बॅनर्जींनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंगळवारी निवडणूक सभेत पीएम मोदींची खिल्ली उडवत त्या पुढे म्हणाल्या, 'निवडणुका आल्या की मंदिरात जाऊन पूजाअर्चा करतात.'
दरम्यान त्या पुढे म्हणाल्या, “मीही ब्राह्मण कुटुंबातील आहे. मला भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. निवडणूक आली की ते देवळात जातात.'' एमजीपीच्या मदतीने टीएमसी सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे त्यांनी जावे. गोव्यात भाजपचा सूर्यास्त सुरु झाला आहे. तसेच त्यांचा सूर्यास्त गोव्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत होईल.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात एसआयटीनेही कबूल केले आहे की, शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना सुनियोजित कट होता. याबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन दिवसीय गोवा दौऱ्यात अनेक काँग्रेस नेते तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाले. तृणमूलने एका निवेदनात म्हटले आहे की, गोवा विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या काही काँग्रेस सदस्यांमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे माजी सदस्य मार्थ सलदान्हा यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, ''गोव्यात तृणमूलच्या नेतृत्वाखाली भाजपविरोधी आघाडी तयार झाली आहे. आणि काँग्रेसला त्यात सामील व्हायचे असेल तर त्यात त्यांनी जरुर सामील व्हावे.'' बॅनर्जी यांच्या सोमवारी गोवा भेटीदरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे 31 सदस्य तृणमूलमध्ये सामील झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.