Goa Shipyard गोवा शिपयार्ड बांधणार चार जहाजे

भारतीय तटरक्षक दलासाठी बांधल्या जाणाऱ्या 2 जहाजांच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
Goa Shipyard will build four ships
Goa Shipyard will build four shipsDainik Gomantak

Goa Shipyard: भारतीय तटरक्षक दलासाठी बांधल्या जाणाऱ्या 2 जहाजांच्या बांधकामाचा शुभारंभ आज संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत वास्को येथील गोवा शिपयार्डमध्ये करण्यात आला.

Goa Shipyard will build four ships
Margao Municipality: मडगाव पालिकेला कोट्यवधींचा नाहक भुर्दंड

या सोहळ्यावेळी तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल, गोवा शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेशकुमार उपाध्याय, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, रियर ॲडमिरल अजय थिओफिलस, मनोज वसंत बाडकर, एच.के.शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

ही जहाजे वेगवान गस्तीनौका असून त्याचे डिझाईन गोवा शिपयार्डने केले आहे. या जहाजांची लांबी ५१.४३ मीटर व रुंदी ८ मीटर एवढी असेल. त्यावर ७ अधिकारी व ३५ खलाशी असा ताफा तैनात करता येईल.

Goa Shipyard will build four ships
Mopa International Airport: ब्ल्यू कॅप प्रीपेड टॅक्सी संघटनेची स्थापन...

जहाजाची कमाल गती २७ नाविक मैवल राहणार आहे. त्याचा अपेक्षित सेवा काल २० वर्षे एवढा असेल. संरक्षण सचिवांच्या हस्ते नवीन स्टोअर्स कॉम्पलेक्सचेही उद्‌घाटन करण्यात आले.

गिरिधर अरमाने यांनी आपल्या भाषणात गोवा शिपयार्डच्या कार्याची प्रशंसा केली. भारतीय उद्योगांच्या सहकार्याने देशी बनावटीवर भर देत असल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्‌गार काढले. हा उद्योग अधिकाधिक स्पर्धात्मक बनत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राकेश पाल यांनीही आपल्या भाषणात गोवा शिपयार्डच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com